हा असा नंगा नाच सुरूय हे मान्य आहे का?; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना सवाल
उर्फी जावेदच्या कपड्यांच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला आहे. काय म्हणाल्या? पाहा...
सोलापूर : उर्फी जावेदच्या (Urfi Javed) कपड्यांच्या मुद्द्यावरून राजकारण सध्या तापलंय. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणावर वेळ वाया घालवायला महिला आयोगाकडे वेळ नाही, असं म्हटलंय. यावर खासदार सुप्रिया सुळेंनीही (Supriya Sule) आपली प्रतिक्रिया दिली. त्यावरून चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला आहे.
असा हा नंगा नाच सुरू आहे, हे सुप्रिया सुळेंना मान्य आहे का? तुम्ही महिला आयोगावर बसवलेल्या रुपाली चाकणकर यांना प्रकरणाचं गांभिर्य नाहीये, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
सुप्रियाताई तुम्ही आम्हाला सल्ले देऊ नका. तुमच्या अध्यक्षांना सल्ले द्या, असं चित्रा वाघ म्हणाल्यात.
महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चुकीची व्यक्ती आहे. फक्त अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणजे महिला आयोग नाहीत. तर महिला आयोगाला सदस्य असतात. एवढंच नव्हे तर राज्याचे पोलीस संचालकही महिला आयोगाचे सदस्य असतात. त्यामुळे चाकणकरांनी कुणाशी बोलून नोटीस पाठवलीय की आपली आपण पाठवली हे प्रश्न अनुत्तरित आहेत. येत्या दिवसांमध्ये टप्प्या टप्प्याने सगळ्या गोष्टी समोर आणू, असं म्हणत चित्रा वाघ यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर भाष्य केलंय. चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यातील वादाबाबत मला काही माहिती नाही. मी अधिक वाचलेलं काही नाही. पण याबाबत वाचून, अभ्यास करून नक्की बोलेन. आज देशासमोर याच्या पेक्षाही मोठे प्रश्न आहेत त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत, असं सुप्रिया म्हणाल्या आहेत.
एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना तुम्हाला पटत असेल मात्र तुमच्या बायकोला जाऊन विचारा हे मान्य आहे का?, चित्रा वाघ म्हणाल्या.
मला एका महिलेने मॅसेज केला तेव्हा उर्फी जावेदचे व्हीडिओ पाठवले. त्यानंतर मला समजले असं काहीतरी सुरु आहे, असंही त्या म्हणाल्या.