अमित शाह आणि फडणवीसांमध्ये ‘सह्याद्री’वर अडीच तास खलबतं

मुंबई : राज्य सरकारच्या मुंबई येथील सह्याद्री या सरकारी अतिथीगृहात भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यात तब्बल अडीच तास राजकीय खलबतं चालली. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारही या बैठकीत सुरुवातीचे एक तास सामील झाले होते. या सर्व नेत्यांनी एकत्रित भोजनही घेतलं. पाच राज्यांच्या निवडणुकींमधे भाजपचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर […]

अमित शाह आणि फडणवीसांमध्ये 'सह्याद्री'वर अडीच तास खलबतं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

मुंबई : राज्य सरकारच्या मुंबई येथील सह्याद्री या सरकारी अतिथीगृहात भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यात तब्बल अडीच तास राजकीय खलबतं चालली. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारही या बैठकीत सुरुवातीचे एक तास सामील झाले होते. या सर्व नेत्यांनी एकत्रित भोजनही घेतलं. पाच राज्यांच्या निवडणुकींमधे भाजपचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय परिस्थतीचा आढावा घेण्यात आला.

विशेषत: तीन राज्यातील सत्ता गेल्यामुळे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेबद्दल तूर्तास तरी पक्षानं जाहीर वाद टाळत सामोपचारानं घेण्याची भूमिका घेण्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती कळते आहे. त्यासोबतच लोकसभा मतदारसंघांबद्दल विभागवार चर्चा झाली असल्याची माहिती मिळते आहे.

ग्रामीण भागात भाजपला इतर राज्यात निवडणुकीत बसत असलेला फटका, राज्यातील दुष्काळी परिस्थती, तसंच मध्य प्रदेश आणि छ्त्तीसगड या राज्यातील काँग्रेस सरकारनं केलेल्या कर्जमाफी विषयीही या बैठकीत झाल्याची माहिती आहे. तसंच राज्य आणि केंद्र सरकाराने केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याविषयीही सर्वोतपरी प्रयत्न केले जावेत या विषयीही चर्चा झाली. तसेच विरोधकांच्या टीकेला आक्रमकपणे उत्तर देण्याचंही या बैठकीत ठरवण्यात आलं.

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये झालेल्या पराभवानंतर भाजपनं लोकसभेची जोरदार तयारी सुरु केली असून बैठकींचा सिलसालही वाढला आहे. लोकसभेत राज्याच्या 48 जागा असल्यानं राजकीयदृष्ट्या महाराष्ट्र भाजपकरता महत्त्वाचे आहे. पंतप्रधान मोदी यांनी कालच मुंबई पुण्यात मेट्रो प्रकल्पांचं भूमिपूजन एकप्रकारे निवडणुकींचं बिगूल फुंकलं आहे. आज मुख्यमंत्री भाजप आमदारांची बैठक घेत राज्यभरातील विधानसभेच्या जागांचा आढावा घेणार आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.