ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, वाट….
आमची भांडणं छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे, असे म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भविष्यात राज ठाकरे यांच्यासोबत युती होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

Devendra Fadnavis : आमची भांडणं छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे, असे म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भविष्यात राज ठाकरे यांच्यासोबत युती होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली आहे. या विधानानंतर उद्धव ठाकरे यांनीदेखील सकारात्मक भूमिका घेतली आहे. यावरच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“बघा जर दोघेही एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्र येत असतील तर यात वाईट वाटायचे कारण नाही. फक्त मला वाटतं की माध्यमं त्यावर जास्त विचार करत आहेत. त्यामुळे वाट बघा. ते एकत्र आले तर उत्तम आहे. आम्ही स्वागत करू,” अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
एकनाथ शिंदे भडकले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या साताऱ्यातील दरेगावात आहेत. यावेळी त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीबाबत विचारण्यात आलं. हा प्रश्न विचारताच एकनात शिंदे चांगलेच भडकले. काय रे तू म्हणत त्यांनी माईक दूर केला आणि प्रश्नाचे उत्तर न देताच निघून केले.
ठाकरे बंधूंच्या युतीची नेमकी चर्चा काय आहे?
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशा आशयाचा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना आमच्यातली भांडणं छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे. मी लार्जर पिक्चर पाहतो, असे म्हणत त्यांनी भविष्यातील युतीचा पर्याय खुला आहे, असे संकेत दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीदेखील माझ्याकडून भांडण कधीच नव्हतं, असं म्हणत महाराष्ट्र द्रोह्यांना जेवणाचे आमंत्रण द्यायचे, जेवायला ज्यायचं, त्यांच्यासाठी प्रचार करायचं थांबवलं तर आम्हीही युती करायला तयार आहोत, असं सूतोवाच केलं. त्यानंतर या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा रंगली आहे.