महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला का निसटला? राज ठाकरेंचा सवाल! एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Vedanta Foxconn News: तब्बल 1.57 लाख कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा, असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, या विषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनीही आपली सविस्तर भूमिका मांडली.

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला का निसटला? राज ठाकरेंचा सवाल! एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 7:11 AM

मुंबई : वेदांता फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) पुण्यात होऊ घातलेला प्रकल्प अचानक गुजरातला स्थलांतरीत होत असल्याचं वृत्त मंगळवारी समोर आलं. त्यानंतर तब्बल 1.57 लाख कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून (Maharashtra Business News) निसटलाच कसा, असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, या विषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde on Raj Thackeray) यांना प्रश्न विचारण्यात आला.lतेव्हा त्यांनीही आपली सविस्तर भूमिका मांडली. मुंबईत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी वेंदाता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केलं.

Video : काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

हे सुद्धा वाचा

मविआ सरकार जबाबदार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचं सरकार येऊन दोनच महिने झालेत असं म्हटलं. पण गेल्या दोन वर्षांत वेदांता फॉक्सकॉन कंपनीला तत्कालीन सरकारकडून जसा प्रतिसाद मिळायला हवा होता, तसा तो कदाचित मिळाला नसेल, म्हणून कंपनीकडून हा निर्णय घेतला गेला असावा, अशी शंका शिंदे यांनी व्यक्त केली.

इतकंच नव्हे तर हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा, यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने प्रयत्न केल्याचंही सांगायला ते विसरले नाहीत. या प्रकल्पासाठी कंपनीला पुण्यात तळेगाव इथं जागा देण्यात आली होती. वेदांता फॉक्सकॉन कंपनीच्या चेअरमनसोबत बैठकही घेतली होती, असंही ते म्हणाले. या बैठकीच्या माध्यमातून 30-35 हजार कोटी रुपयांची सवलत देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले होते, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय. यात काही सबसिडींचाही समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

केंद्रासोबत उद्योग वाढीसाठी संपर्क

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आम्ही राज्यात उद्योग वाढावा यासाठी काम करत आहोत, असं शिंदेंनी यावेळी सांगितलं. त्यासाठी केंद्राने सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. सोबत केंद्रीय रेल्वे आणि उद्योग मंत्र्यांशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्याचं यावेळी म्हटलं.

नव्या उद्योगासाठी जे जे लागतं, ते ते सगळं देण्याचा पूर्ण प्रयत्न नवं सरकार करेल. तसंच उद्योग यावेत, यासाठी काय करायला हवं, याबाबतही केंद्रीय मंत्र्यांनी काही गोष्टी आपल्याला सांगितल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय. मुंबई घेण्यात आलेल्या शिंदे गटाच्या पदााधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते.

राज ठाकरेंनी काय म्हटलं होतं?

प्रचंड रोजगारनिर्मिती करणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा, असा प्रश्न करत राज ठाकरेंनी फॉक्सकॉन-वेदांताच्या सेमीकंटक्टर बनवण्याच्या प्रकल्पावरुन नाराजी व्यक्त केली होती. ट्वीट करत राज ठाकरेंनी या संपूर्ण प्रकाराच्या चौकशीची मागणी केली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.