CM Eknath Shinde : ‘अरे बाबा थांब जरा’ मध्यरात्री झालेल्या सत्कारानंतरच्या भाषणात एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी

Eknath Shinde Dadar Speech : संजय शिरसाट यांच्या नेतृत्त्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

CM Eknath Shinde : 'अरे बाबा थांब जरा' मध्यरात्री झालेल्या सत्कारानंतरच्या भाषणात एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्रीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 6:40 AM

मुंबई : गुरुवारी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. दादरच्या (Dadar) रविंद्र नाट्य मंदिर येथे हा सत्कार सोहळा पार पडला. संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या वतीने एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या नेतृत्त्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. रात्री एक वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी बंडखोरी दरम्यान, नेमकं काय काय घडलं, यावर भाष्य केलंय. मध्यरात्री असा मेळावा कुणी घेऊ शकत नाही, असंही ते म्हणाले. जे काही चाललं, त्यात संजय शिरसाट पुढे होते, असंही ते म्हणाले. दरम्यान, एकानाथ शिंदे यांना भेटायला आलेल्या दिव्यांग व्यक्तीला स्टेजवर बोलवून त्यांचाही सन्मान करण्यात आला.

‘अरे बाबा थांब जरा’

संजय शिरसाट नेमकी विचारायचे, साहेब कधी करणार, काय कराचंय, पण मी बोललो बाबा थांब जरा, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडखोरीच्या रणनितीबाबत भाष्य केलंय. सहा महिन्यात चित्र बदलत गेलं. चित्र घातक होत होतं, असं ते म्हणाले. आम्ही खूप प्रयत्न केले होते, पण काहीच झालं नाही, असंही त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसवरही त्यांनी निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस सगळीकडेच आमदारकीची तयारी करते, हे आम्हाला लक्षात आलं. पण आमदारांना निधी मिळत नव्हता, असा आरोपही त्यांनी पुन्हा एकदा केला. शिवसेना चार नंबरवर गेली. आम्ही हिंदुत्वाचा झेंडा फडकवल्यावर तुम्ही कॅबिनेटमध्ये नामांतराचा निर्णय घेतला, असं म्हणत शिंदेंनी हल्लाबोल केला. शिवसेना वाचवण्यासाठी ही क्रांती आहे असंही ते म्हणाले.

सगळं ओके वाटतंय!

दरम्यान, मी संजय शिरसाट यांना विचारतो, की तुम्ही मुंबईत असता, मग मतदारसंघात काय करायचं? पण ते बोलले की मतदारसंघ ओके आहे. आता पाहिलं तर खरंच एकदम ओके वाटतंय, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांची स्तुती केली. तसंच शहाजी बापू सारख्या लोकांच्या कला गुणांना वाव देण्याचं काम केल्याचंही शिंदे म्हणाले. आत्मपरिक्षण करायचं सोडून आम्ही कसे बंडखोर आहोत, हे सांगण्यात आल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी खंत व्यक्त केली. आम्ही घेतलेला निर्णय लोकांनी मान्य केल्याचंही त्यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

सकाळी टीव्हीवर बोलणाऱ्यांनी हे बघावं जरा, असं म्हणत संजय राऊतांनाही एकनाथ शिंदे यांनी डिवचलं कोर्टात चार मागण्या केल्या आणि म्हणतात कोर्टात आमचा विजय झाला, असंही ते शिंदे म्हणाले. कोर्टानं त्यांचं म्हणणं फेटाळल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.