‘त्यांनी आमच्या खात्यातून 50 कोटी घेतले’, मुख्यमंत्र्यांचा सभागृहात सर्वात गंभीर आरोप

स्वार्थासाठी विचार विकेलेल्यांनी अशाप्रकारचा कांगावा करणं हे हास्यास्पद आहे. विचार विकले, भूमिका विकली, आयडोलॉजी विकली, सत्तेसाठी सर्व केलं, पण मग सरकार चांगलं काम करतं तर टीका करतात. सारखं चोरलं म्हणून बोलायचं ही कोणती भूमिका आहे? अरे मर्दासारखं बोलाना", असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केला.

'त्यांनी आमच्या खात्यातून 50 कोटी घेतले', मुख्यमंत्र्यांचा सभागृहात सर्वात गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 5:22 PM

मुंबई | 1 मार्च 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत विरोधकांच्या विरोधात चांगलेच फटकेबाजी केली. त्यांनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. “विरोधकांची एकच स्क्रिफ्ट आणि एकच ड्राफ्ट असतो. एका स्क्रिप्टवर एकच चित्रपट बनवता येतो ना? त्यामुळे यांचे चित्रपट फ्लॉप होच चालले आहेत. नाना पटोले तुम्ही प्रामाणिकपणे कबुल करा, तुम्ही खासगीमध्ये जेव्हा भेटता तेव्हा कबूल करता की, चांगले निर्णय घेतले आहेत. जे आहे ते घेतले आहेत. पैसे दिले आहेत. तुम्हाला कुठेही बोट दायखवायला जागा आम्ही सरकार देत नाहीत. तुम्ही मुद्द्यावर टीका केली पाहिजे. सरकार चुकत असेल तर टीका केली पाहिजे. पण काही बोलायचं नसेल तर मुद्द्यावर बोलायचं नाही. अपशब्द वापरायचे, आरोप करायचे, मुद्दा सोडून गुद्द्यावर यायचं हे सगळं बाहेर आणि आत चालू असतो”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

“तयतयाट करायचा, पक्ष चोरला म्हणून, चिन्ह चोरलं म्हणून, रोजच सुरु आहे, हे काय? अशी नवीन राजकीय संस्कृती जी निर्माण झालीय ते बरोबर नाही. स्वार्थासाठी विचार विकेलेल्यांनी अशाप्रकारचा कांगावा करणं हे हास्यास्पद आहे. विचार विकले, भूमिका विकली, आयडोलॉजी विकली, सत्तेसाठी सर्व केलं, पण मग सरकार चांगलं काम करतं तर टीका करतात. नाना तुम्ही वैयक्तिक घेऊ नका. सारखं चोरलं म्हणून बोलायचं ही कोणती भूमिका आहे? अरे मर्दासारखं बोलाना. जाहीरपणे बोला. जे देतोय ते जाहीरपणे देतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘त्यांनी आमच्याच खात्यातून 50 कोटी घेतले’

“आम्हाला खोके खोके म्हणणारे, त्यांनी आमच्याच खात्यातून 50 कोटी घेतले आहेत. त्याची आता चौकशी सुरु आहे. शिवसेनेच्या खात्यातले 50 कोटी घेतले”, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. “शिवसेना अधिकृतपणे आमच्याकडे आहे, धनुष्यबाण आमच्याकडे आहे. खोके पुरत नाही म्हणून… मी नाही म्हणत, कुणीतरी म्हटलं आहे”, असं शिंदे म्हणाले.

“विरोधी पक्षनेते कुठे आहेत? मी त्यांचं भाषण सुरु आहे म्हणून आलो. मी त्यांचं ऐकून घेतलं. पण आता माझी बोलण्याची वेळ आली तर निघून गेले. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोन चाकं आहेत. ते येत आहेत तर ठीक आहे. विरोधकांचा बाराही महिने राजकीय धुळवड करण्याचा प्रयत्न हा अतिशय केविलपणाचा आहे”, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.