Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली मोदी, शाह यांची भेट, भेटीनंतर शिंदे म्हणतात मी कोणाला घाबरत नाही…

या दुसऱ्या भेटीनंतर तरी मंत्रिमंडळ विस्ताराला नवा मुहूर्त मिळून राज्याला नवं मंत्रिमंडळ मिळणार का? असा सवाल विचारण्यात येत आहे. त्यालाही त्यांनी उत्तर दिलंय. 

Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली मोदी, शाह यांची भेट, भेटीनंतर शिंदे म्हणतात मी कोणाला घाबरत नाही...
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली मोदी, शाह यांची भेट, भेटीनंतर शिंदे म्हणतात मी कोणाला घाबरत नाही...Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 11:00 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) हे मुख्यमंत्री झाल्यापासून आज दुसऱ्यांदा दिल्लीत दाखल झालेत. त्यांनी आज दिल्लीत अनेक बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis हेही आहेत. त्यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून आज दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली आहे, राज्यातला रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) कधी होणार? असा सवाल विरोधकांकडून रोज त्यांना विचारण्यात येत आहे. यावर त्यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या भेटीनंतर मी कुणाला घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे, तर आता या दुसऱ्या भेटीनंतर तरी मंत्रिमंडळ विस्ताराला नवा मुहूर्त मिळून राज्याला नवं मंत्रिमंडळ मिळणार का? असा सवाल विचारण्यात येत आहे. त्यालाही त्यांनी उत्तर दिलंय.

दिल्लीतून एकनाथ शिंदे काय म्हणाले?

दिल्लीतील भेटीबाबत एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, राष्ट्रपतींच्या विजयानंतर आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचे जेवण होतं. त्या ठिकाणी सर्वच भेटले. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असेही त्यांनी सांगितलं, तसेच सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीसाठी थांबला आहात का असे विचारले असात, असं काहीच नाही, सुप्रीम कोर्टाने असं काही सांगितलेलं नाही. सुप्रीम कोर्टाचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काही संबंध नाही आणि कुठल्याही कामकाजावर देखील सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेलानाही. त्यामुळे तो विषय नाही, आम्ही लवकरात मंत्रिमंडळाचा विस्तार करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. धिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असेही सांगितले आहे. तसे यादीवर चर्चा करायची असतील तर मुंबईत होईल ती दिल्लीत कशाला होईल, असेही शिंदे म्हणाले.

मी कशालाही घाबरत नाही

तर त्यांच्या सुरक्षेबाबत विचारले असाता ते म्हणाले, त्यावेळेस नक्षल धमक्या होत्या. शेवटी नक्षलग्रस्त भागामध्ये गडचिरोलीमध्ये मी गेले अडीच वर्षे काम करतो आहे आणि त्यामुळे मी ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर विकासाची काम असतील किंबहुना त्या ठिकाणी नवीन उद्योग आहेत, ते सुरू करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, त्यामुळे मी कशालाही घाबरत नाही. तसेच सुरक्षा हा गृह खात्याचा विषय आहे, मला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही, तसेच तुम्ही गृहमंत्र्यांशी बोललात तर तुम्हाला नक्की कायदे काय आहेत, हे सांगतील, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता ही दिल्ली वारी संपल्यावर तरी मंत्रिमंडळ विस्तार होणार का? याही प्रश्नाचे उत्तर आगामी काही दिवसात मिळेलच.

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.