Cm Eknath Shinde : महाविकास आघाडीला आणखी एक दणका, बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती, कुणाच्या बदल्यांना ब्रेक?

सरकार बदलल्यावर अधिकाऱ्यांच्या बदल्या होणं हे काही नवं नसले, तरी एकनाथ शिंदे यांचा निर्णयाचा धडाका पाहता महाविकास आघाडीची डोकेदुखी यामुळे वाढत आहे.

Cm Eknath Shinde : महाविकास आघाडीला आणखी एक दणका, बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती, कुणाच्या बदल्यांना ब्रेक?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 7:07 PM

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि भाजप यांचं युतीचे सरकार आल्यापासून महाविकास आघाडीला अनेक धक्के दिले आहेत. त्यातच आता आणखी एका झटक्याची वाढ झाली आहे. शिंदे सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारच्या (Uddhav Thackeray) काळात झालेल्या बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना (Officer Transfer) शिंदे सरकारने आता ब्रेक लावला आहे. आयएएस ऑफिसर लेवलच्या बदल्या थांबवण्यात आल्या आहेत. यामध्ये आस्तिक पांडे, दीपा मुंडे, अभिजीत चौधरी, यांच्या बदलीला स्थगिती दिल्याची माहिती समोर आली आहे. या बदल्या ठाकरे सरकारकडून 29 जून ला करण्यात आल्या होत्या. सरकार बदलल्यावर अधिकाऱ्यांच्या बदल्या होणं हे काही नवं नसले, तरी एकनाथ शिंदे यांचा निर्णयाचा धडाका पाहता महाविकास आघाडीची डोकेदुखी यामुळे वाढत आहे.

ठाकरेंचे निर्णय, शिंदेंचे ब्रेक

राज्यात ठाकरे सरकार पडण्याचे संकेत एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतरच मिळाले होते. मात्र त्यानंतरही काही निर्णय हे अतिशय वेगवान पातळीवर ठाकरे सरकारकडून घेण्यात आले. त्यात औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचाही निर्णय होता. तसेच अनेक जीआरही सरकारने याच काळात काढले. अधिकाऱ्यांच्या बदल्याही तातडीने करण्यात आल्या. होत्या मात्र आता त्याच बदल्यांना एकनाथ शिंदे यांनी ब्रेक लावला आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश

याच नव्याने स्थगित करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये औरंगाबाद मधील काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही समावेश आहे. सांगलीच्या जिल्हाधिकारी पदी दीपा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. औरंगाबाद पालिकेच्या आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांची औरंगाबादला सिडकोत दीपा मुंडे यांच्या जागी बदली करण्यात आली होती. मात्र याही बदलांना हातात तातडीने ब्रेक लागला आहे. त्यामुळे या ठिकाणी लवकरच नव्या नियुक्ती जाहीर होण्याची ही दाट शक्यता आहे. मात्र या बदल्यांवरून एक वेगळा राजकीय संघर्ष वाढण्याची हे दाट शक्यता आहे.

पुण्यातल्या काही अधिकाऱ्यांच्याही बदल्यांची शक्यता

राज्यात भाजप सरकार जाऊन ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यानंतर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या याही तातडीने करण्यात आल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती आता पुन्हा झाली आहे. दोन दिवसापूर्वी शिंदे सरकारने आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतल्या एका अधिकाऱ्याबाबत ही मोठा निर्णय घेतला आहे. असे निर्णय राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या बाबतीत होण्याची आगामी काळात दाट शक्यता आहे. पुण्यातल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्याची ही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनात मोठी खांदेपालट पाहयला मिळणार आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.