कर्नाटक सरकार आता स्वत: महाराष्ट्रातील मंत्र्यांना निमंत्रित करणार- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांचं महत्वपूर्ण ट्विट...

कर्नाटक सरकार आता स्वत: महाराष्ट्रातील मंत्र्यांना निमंत्रित करणार- देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 12:26 PM

मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक महत्वपूर्ण ट्विट केलं आहे.

कर्नाटक सरकार आता स्वत: महाराष्ट्रातील मंत्र्यांना निमंत्रित करणार आहे, असं ट्विट फडणीवीस यांनी केलंय.

महाराष्ट्राची जी भूमिका सुप्रीम कोर्टात आहे, तीच भूमिका आजही कायम आहे. मराठी भाषिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्र्यांची समिती काम करेल. सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची भूमिका ही तटस्थ असली पाहिजे, हे आम्ही सांगितले. ते केंद्र सरकारने मान्य केले, असं फडणवीस म्हणालेत.

मराठी भाषिकांच्या समस्या, त्यांच्या कार्यक्रमांना परवानगी, मराठी भाषा जतन करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना इत्यादी विविध बाबतीत सुद्धा आम्ही मुद्दे मांडले. त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आमचे नेते,केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांनी आज पुढाकार घेत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी एक महत्त्वाची बैठक घेतली, त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे, असं फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

अमित शाह यांनीही सीमावादावर सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या सीमावादावर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली आणि हा वाद घटनात्मक मार्गाने सोडवण्यावर एकमत झाले. तसेच, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कोणतेही राज्य एकमेकांच्या जमीनीवर दावा करणार नाहीत यावर एकमत झाले, असं अमित शाह यांनी म्हटलंय.

तर राज्यातून येणाऱ्या लोकांना कोणतीही अडचण येऊ नये कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावा,यासाठी दोन्ही राज्यांच्या वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होणार. जनतेला भडकावणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. लोक हितासाठी विरोधी पक्ष यावर राजकारण करणार नाही, याची मला खात्री आहे, असंही अमित शाह म्हणालेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.