Eknath Shinde: आमदारानंतर आता बारी नगरसेवकांची! कोणत्या पालिकेत शिंदेंना वाढता पाठिंबा? 5 महत्त्वाचे मुद्दे

CM Eknath Shinde News : एकनाथ शिंदे यांच्या आसपास असलेल्या पालिकांमधली स्थिती काय आहे, त्यावर एक नजर टाकुयात...

Eknath Shinde: आमदारानंतर आता बारी नगरसेवकांची! कोणत्या पालिकेत शिंदेंना वाढता पाठिंबा? 5 महत्त्वाचे मुद्दे
एकनाथ शिंदे आणि मुंबई पालिकाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 11:06 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांनी शिवसेना आमदार फोडल्यानंतर आता नगरसेवकांचा नंबर लागला आहे. आगमी पालिका निवडणुकांच्या (Municipality Elections 2022) पार्श्वभूमीवर ठाण्यात आधीच शिवसेनेला (Shiv sena News) मोठं भगदाड पडलंय. अवघा एक नगरसेवस सोडला, उरलेले सगळे जण एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. हीच अवस्था काहीशी पुण्यात दिसली आहे. तर दुसरीकडे ठाण्यानंतर नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकांनीही एकनाथ शिंदे गटाला सामीन होण्याचा निर्णय घेतलाय. तसंच कल्याण डोंबिवली पालिकेतील नगरसेवकांनीही शिंदेना पाठिंबा देण्याचं ठरवलंय. त्यामुळे पालिका निवडणुकांच्या आधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. याआधी मुंबई पालिकेतील काही नगरसेवकांनीही शिंदेंना समर्थन द्यायचा निर्णय घेतलाय, अशी कुजबूज ऐकायला मिळाली होती. या सर्व घडामोडींमध्ये नेमकी एकनाथ शिंदे यांच्या आसपास असलेल्या पालिकांमधली स्थिती काय आहे, त्यावर एक नजर टाकुयात…

1 मुंबई पालिका :

मुंबई पालिकेत शिवसेनेचे 84 नगरसेवक आहेत. त्यातील काही जण हे शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहेत. मात्र अद्यापतरी शिंदेच्या गटात बीएमसीतील नगरसेवक सामील झाल्याचं खात्रीलायक वृत्त हाती आलेलं नाही. मात्र येत्या काळात मुंबई पालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक फुटणारच नाही, अशी शक्यता आताच नाकारणंही घाईचं ठरेल. बीएमसीच्या 236 जागांपैकी 50 टक्के जागा निवडून आणण्यासाठी भाजपकडून एकनाथ शिंदेच नव्हे शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, सदा सरवणकर, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर यांचा वापर करुन घेतला गेला, तर आश्चर्य वाटायला नको.

2 नवी मुंबई :

नवी मुंबईत एकनाथ शिंदे यांचा दबदबा राहिलेला आहे. त्यांना शिवसेनेच्या 32 नगरसेवकांनी पाठिंबा दिलाय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची नवी मुंबईतली ताकद वाढलेली आहे.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ : काय म्हणतायत नवी मुंबईकले पदाधिकारी?

3 ठाणे :

ठाणे पालिकेतल्या 67 पैकी 66 नगरसेवांनी एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यामुळे आता ठाणे पालिकेस उद्धव ठाकरेंच्या समर्थनात असलेला निव्वळ एकच नगरसेवक उरला आहे.

4 कल्याण डोंबिवली :

केडीएमसीचे शिवसेनेचे 55 पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे गटात सामील झालेत. सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीये. तसच डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे सुद्धा शिंदे गटात सामील झालेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा वाढत असल्याचं दिसून आलंय. कल्याण डोंबिवली पाठोपाठ बदलापूर, अंबरनाथ इथंही शिवसेनेला धक्का बसण्याची दाट शक्यता आहे.

5 पुणे आणि नाशिक :

नगरसेवक फुटण्याचं सत्र हे काही फक्त मुंबई आणि आसपासच्या पालिकांमध्येच दिसतंय, अशातला भाग नाही. पण पुण्यातही शिवसेनेला खिंडार पडणार, असं चित्र निर्माण झालंय. येत्या 24 तासात याबाबतचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो, असं सांगितलं जातंय. पुण्यासोबत नाशिकमध्येही शिवसेनेचे नगरसेवक आणि काही पदाधिकारी आपला पाठिंबा एकनाथ शिंदे गटाला जाहीर करतील, अशी माहिती मिळतेय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.