Cm Eknath Shinde : फडणवीसांच्या हस्तक्षेपामुळे राज्याचा अपमान, मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदा घेणं बंद करावं, राष्ट्रवादीचा नेमका आक्षेप काय?
चित्रा वाघ यांनी महिला अत्याचाऱ्याच्या केसेस घेतल्यात त्यापैकी तडीस किती गेल्यात? सोलापूरच्या श्रीकांत देशमूखांचा व्हिडीओ त्यांनी पोस्ट का नाही केला? असे सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलेत.
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी प्रेस कॉन्फरन्स घेणं बंद करावं, त्याऐवजी फडणवीसांना घेऊ द्यावी, असा खोचक टोला राष्ट्रवादीनं लागवला आहे. तसेच त्यांचं कारणही सांगितलं आहे, एकनाथ शिंदेंचा जो प्रेस कॉन्फरन्स दरम्यान, देवेंद्र फडवणीसांच्या हस्तक्षेपामुळे अपमान होतोयं तो महाराराष्ट्रच्या जनेतेला आवडत नाहीये. अशी खोचक टीका महाराष्ट्र राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी केलीय. याचं दरम्यान बोलताना भाजप कार्यकर्त्या चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंवर केलेल्या ट्विटचाही त्यांनी समाचार घेतलाय, चित्रा वाघ यांनी महिला अत्याचाऱ्याच्या केसेस घेतल्यात त्यापैकी तडीस किती गेल्यात? सोलापूरच्या श्रीकांत देशमूखांचा व्हिडीओ त्यांनी पोस्ट का नाही केला? असे सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलेत. पुण्यातल्या भोर मध्ये राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमासाठी आले असताना ते बोलत होते.
महाराष्ट्राला दिलासा कधी मिळणार?
भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, विविध कार्यकारी संस्थांच्या निवडणूकीत विजयी झालेल्या संचालकांचा सत्काराचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्या दरम्यान त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. एकनाथ शिंदे हे 20 दिवसात तीन वेळा दिल्लीला गेलेले आहेत, महाराष्ट्र महापुरात बुडाला असताना त्याला दिलासा देण्याऐवजी मंत्रीमंडळच्या विस्तारासाठी शिंदे दिल्लीला जातायत, महाराष्ट्रातल्या आमदारांना 20-20 तास महाराष्ट्र सदन मध्ये मोदींच्या भेटीची वाट पाहत बसावं लागतंय असाही गंभीर आरोप त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर केलाय.
याच कार्यक्रमात ते बोलत होते
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोर तालुका विविध विकास सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून हजर राहण्याचा योग आला. @NCPspeaks pic.twitter.com/gftA7Iyukm
— Ravikant Varpe – रविकांत वरपे (@ravikantvarpe) July 22, 2022
गेल्या अनेक दिवसातल्या घडामोडी चर्चेत
नवस सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक पत्रकार परिषदा पार पडल्या आहेत. या पत्रकार परिषदेत घडलेले प्रकार कॅमेऱ्याने अलगट टिपले आहेत. यात कधी फडणवीस हे मुख्यमंत्री बोलत असताना त्यांच्यासमोरचा माईक घेताना दिसून आले. तर कधी पत्रकार परिषदेत चिठ्ठी पाठवताना दिसून आले. त्यामुळे त्यावरून बराच राजकीय गदारोळ आणि टीका टिपणी सुरू होती. त्यातच आता राष्ट्रवादीने त्यावरूनच खोचक टोलेबाजी भाजप आणि शिंदेंना केलीय. त्यामुळे आता तरी पत्रकार परिषदेत हे दिसायचं बंद होणार? की पुढेही दिसत राहणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.