शिवाजी पार्कात मेळावा का नाही?; मुख्यमंत्री म्हणाले, मैदान कोणतेही असो…

आम्ही निश्चितच एकत्र लढणार आहोत. आमची युती ही नैसर्गिक युती आहे. शिवसेना आणि भाजपचं सरकार राज्यात काम करत आहे.

शिवाजी पार्कात मेळावा का नाही?; मुख्यमंत्री म्हणाले, मैदान कोणतेही असो...
शिवाजी पार्कात मेळावा का नाही?; मुख्यमंत्री म्हणाले, मैदान कोणतेही असो...Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 9:49 AM

मुंबई: मुंबईत यंदा शिवसेनेचे (shivsena) दोन दसरा मेळावे होत आहेत. दोन्ही गटाने आम्हीच ओरिजिनल शिवसेना असल्याचा दावा केला आहे. शिवाजी पार्कात उद्धव ठाकरे (uddhav thackeray) संबोधित करणार आहेत. तर बीकेसीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) संबोधित करणार आहेत. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. आम्हीच खरी शिवसेना आहोत. आमच्याकडे आकडे आहेत. आम्हीच बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे आहोत, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटीव्हीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्हीच खरी शिवसेना असल्याचा पुनरुच्चार केला. मी दसरा रॅलीची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. या रॅलीला महाराष्ट्रभरातून हजारो लोक येणार आहेत. राज्यभरातून येणाऱ्या या लोकांना कोणताही त्रास होऊ नये. ते आरामशीर यावेत आणि जावेत यासाठी संपूर्ण विभागाचे लोक काम करत आहेत. उद्या तयारी पूर्ण होईल. ही रॅली यशस्वी होईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

मैदान कोणतेही असो. त्याने फरक पडत नाही. विचार महत्त्वाचे आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे घेऊन जात आहोत. त्यांची भूमिका पुढे नेत आहोत. त्यामुळेच आमच्यासोबत लोक येत आहेत. पाठिंबा देत आहेत. मी जिथे जिथे जातो, तिथे लोकांना भेटतो. त्यांची भावना समजून घेतो. त्यावेळी आमची भूमिका योग्यच होती हे दिसून येते, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

लोकशाहीत संविधान आहे. त्यानुसार गोष्टी घडत असतात. लोकशाहीत बहुमत महत्त्वाचं असतं. आमच्याकडे 55 पैकी 40 आमदार आहेत. 10 अपक्ष आमदारही आहेत. अपक्षांना सोडा. पण 55 पैकी 40 आमदार आमच्याकडे आहेत. 18 पैकी 12 खासदार आमच्यासोबत आहेत.

देशातील 14 राज्यांचे प्रमुख आमच्यासोबत आहेत. लाखो लोक आमच्यासोबत आहेत. त्यावरून आमच्याकडे बहुमताचा आकडा असल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत हे दिसून येतं, असंही ते म्हणाले.

भाजपसोबत महापालिका निवडणुका लढवणार का? असा प्रश्न केला असता मुख्यमंत्र्यांनी थेट उत्तर दिलं. आम्ही निश्चितच एकत्र लढणार आहोत. आमची युती ही नैसर्गिक युती आहे. शिवसेना आणि भाजपचं सरकार राज्यात काम करत आहे. येणाऱ्या सर्वच महापालिका आम्ही एकत्र लढणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.