राज्यात राजकीय घडामोडींना वेग, शरद पवार घेणार एकनाथ शिंदेंची भेट, कारण…

आज दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट होणार आहे.

राज्यात राजकीय घडामोडींना वेग, शरद पवार घेणार एकनाथ शिंदेंची भेट, कारण...
Follow us
| Updated on: Jul 22, 2024 | 9:56 AM

Eknath Shinde-Sharad Pawar Meet : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट होणार आहे. या भेटीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं”, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणासाठी बसले आहेत. तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरु असलेल्या आंदोलनावर सत्ताधारी महायुती आणि महाविकासआघाडीतील घटक पक्ष आमने सामने आले आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणरा असल्याचे बोललं जात आहे. या भेटीत मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शरद पवार घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची ही भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्यावर ही भेट होणार आहे. आज दुपारी 2 वाजता शरद पवार हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत माढा लोकसभा मतदारसंघ, पाणी प्रश्न, बारामती तालुक्यातील केलेली शेतीची पाहणी आणि निधी या मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच गुंजवणी पाणी प्रश्नासाठी शरद पवार यांच्याकडून मुख्यमंत्र्यांची वेळ मागण्यात आली होती. याच मुद्द्यावर शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट होणार आहे.

छगन भुजबळांनी घेतलेली पवारांची भेट

दरम्यान गेल्या आठवड्यात अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत छगन भुजबळ यांनी शरद पवारांना मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर लक्ष घालण्याची विनंती केली होती. या विनंतीनंतर आता शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत.

सर्वपक्षीय बैठकीला महाविकासआघाडीचे नेते अनुपस्थित

तसेच काही दिवसांपूर्वी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते गैरहजर होते. त्यावरून सत्ताधारी महायुतीने महाविकास आघाडीवर टीका केली होती. तसेच शरद पवार यांच्या सांगण्यावरून महाविकास आघाडीचे नेते या बैठकीला गेले नाहीत, असा आरोपही करण्यात आला होता. त्यानंतर छगन भुजबळ यांनी अचानक शरद पवार भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले होते.

'मी परफ्यूम मारून जातो, उलट्या कशा होतील', भुजबळांचा कुणाला खोचक टोला?
'मी परफ्यूम मारून जातो, उलट्या कशा होतील', भुजबळांचा कुणाला खोचक टोला?.
रोज भूमिका बदलण्यापेक्षा हिंमत असेल तर...भुजबळांचं जरांगेना ओपन चॅलेंज
रोज भूमिका बदलण्यापेक्षा हिंमत असेल तर...भुजबळांचं जरांगेना ओपन चॅलेंज.
लाडकी बहीण दादांचीच? अजित पवारांनी ती योजना हायजॅक केली? भुजबळ म्हणाले
लाडकी बहीण दादांचीच? अजित पवारांनी ती योजना हायजॅक केली? भुजबळ म्हणाले.
'लाडकी बहीण'च्या तोडीस तोड नवी योजना, 1500 नाहीतर इतकी रक्कम मिळणार?
'लाडकी बहीण'च्या तोडीस तोड नवी योजना, 1500 नाहीतर इतकी रक्कम मिळणार?.
'टप्प्यात येण्याआधी बोलायचं नसतं', जयंत पाटील मिश्किलपणे काय म्हणाले?
'टप्प्यात येण्याआधी बोलायचं नसतं', जयंत पाटील मिश्किलपणे काय म्हणाले?.
सरकारच्या माफीनाम्यावरून जयंत पाटील म्हणाले, ‘...ही आमची मागणी नव्हती’
सरकारच्या माफीनाम्यावरून जयंत पाटील म्हणाले, ‘...ही आमची मागणी नव्हती’.
शरद पवारांच्या मनात CM म्हणून कोण? सुप्रिया सुळे की जयंत पाटील?
शरद पवारांच्या मनात CM म्हणून कोण? सुप्रिया सुळे की जयंत पाटील?.
महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं....
महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं.....
दादा गुलाबी झाले, पण भगवे नाहीत? दादांसोबतच्या युतीवर फडणवीस म्हणाले..
दादा गुलाबी झाले, पण भगवे नाहीत? दादांसोबतच्या युतीवर फडणवीस म्हणाले...
लाडक्या बहिणींना 1500 ची ओवाळणी देणारा मोठा भाऊ कोण? फडणवीस म्हणाले...
लाडक्या बहिणींना 1500 ची ओवाळणी देणारा मोठा भाऊ कोण? फडणवीस म्हणाले....