सुटाबुटातले दादा, जॅकेटातले अशोकराव, महाराष्ट्रातल्या सर्वाधिक चर्चेतल्या फोटोची खासियत, वाचा सविस्तर…

| Updated on: Jun 09, 2021 | 10:49 AM

मुख्यमंत्री आणि पंतप्रधान भेटीचा जो फोटो माध्यमांना देण्यात आला आहे, त्या भेटीचा फोटो मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आपण पाहूयात फोटोत नेमकं दडलंय काय...? (Cm Uddhav thackeray DCM Ajit Pawar And Minister Ashok Chavan Dressing Sence And photo With pm Modi At New Delhi)

सुटाबुटातले दादा, जॅकेटातले अशोकराव, महाराष्ट्रातल्या सर्वाधिक चर्चेतल्या फोटोची खासियत, वाचा सविस्तर...
हाच तो मुख्यमंत्री पंतप्रधान भेटीचा चर्चेतला फोटो...!
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) हे पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) राजधानी नवी दिल्लीत भेटले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मंत्री अशोक चव्हाणही (Ashok Chavan) होते. भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनमध्ये (Maharashtra Sadan) प्रेस कॉन्फरन्स घेतली. भेटीत काय मागण्या केल्या गेल्या, मोदींचा काय प्रतिसाद होता यावर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर निवेदन केलं. चर्चेतल्या मुद्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. पण आणखी एका गोष्टीवर मोठा खल केला जातोय आणि ती गोष्ट आहे फोटो. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान भेटीचा जो फोटो माध्यमांना देण्यात आला आहे, त्या भेटीचा फोटो मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. (Cm Uddhav thackeray DCM Ajit Pawar And Minister Ashok Chavan Dressing Sence And photo With pm Modi At New Delhi)

हाच तो मुख्यमंत्री पंतप्रधान भेटीचा चर्चेतला फोटो…!

काय खास आहे ‘त्या’ फोटोत?

महाराष्ट्रात ज्या एका फोटोची चर्चा आहे तो हाच फोटो. ह्या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण आहेत. या फोटोत नेत्यांची जी देहबोली आहे त्यावर बरीचशी चर्चा रंगते आहे. ही चर्चा नेमकी कशी झाली असावी, देहबोली सकारात्मक आहे की नकारात्मक यावरही खल केला जातो आहे. विशेष म्हणजे ह्या फोटोत सर्वांचं लक्ष वेधलं आहे ते अजित पवारांनी. त्याचं कारणही खास आहे. नेहमी पांढऱ्या कपड्यात वावरणारे अजित पवार ह्या फोटोत मात्र एकदम सुटाबुटात दिसतायत. मुख्यमंत्र्यांचा ड्रेस सेन्स पहिल्यापासूनच काबिल ए तारीफ आहे. त्याची चर्चा नेहमीच होत असते. ते सहसा टिपिकल नेतेगिरी ड्रेसमध्ये कधीच नसतात. ह्या फोटोतही नाहीत.

जॅकेटातले अशोकराव, सुटाबुटातले दादा

ह्या फोटोत अशोक चव्हाणही आहेत. मराठा आरक्षण समितीचं सर्वकाही तेच बघतात. म्हणून ते शिष्टमंडळात आहेत. ते नसते तरीसुद्धा कुणी तरी एक नेता काँग्रेसचा ह्या शिष्टमंडळात असताच. अशोकरावांच्या पेहरावाचीही तेवढीच चर्चा आहे. ते मुख्यमंत्री असताना अनेक वेळेस सुटाबुटात दिसायचे. पण ते पद गेलं आणि अशोकरावांचा तो पेहरावही दिसेनासा झाला. आता ते मोदी भेटीला गेले तर थेट स्काय ब्लू कलरच्या जॅकेटात. तो शांततेचा रंग मानला जातो. विशेष म्हणजे ह्या फोटोत अशोकराव असे एकमेव आहेत ज्यांच्या पायात चप्पला आहेत. इतर तीनही नेत्यांच्या पायात शूज आहेत. नेटकऱ्यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटलेली नाही.

कुणाची देहबोली काय सांगते?

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राचे प्रश्न संयमानं, धैर्यानं ऐकूण घेतल्याचं नंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये नेत्यांनी सांगितलं. ह्या फोटोतही नरेंद्र मोदी हे कान देऊन ऐकताना दिसत आहेत. अशोकराव बोलतायत तर मुख्यमंत्र्यांची नजरही अशोकरावांवरच आहे. मोदींची नजर अशोकराव आणि मुख्यमंत्र्यांवर दिसते आहे. अशोकराव बहुतेक मराठा आणि ओबीसी आरक्षणाबद्दल बोलत असावेत असा कयास बांधला जातोय. कारण त्यांच्याकडे त्याचीच जबाबदारी आहे. अशोकरावांनी बोलते वेळेस पायाला घडी घातलीय ती नेटकऱ्यांना निगेटीव्ह वाटते.

अजितदादा-शिस्तप्रिय विद्यार्थी की डिप्लोमॅट?

अशोकरावांच्या बसण्याच्या पद्धतीची तुलना ही अजित पवारांच्या देहबोलीशी केली जातेय. अनेकांना दादा म्हणजे वर्गात पहिल्या बाकावर बसणाऱ्या शिस्तप्रिय हुशार विद्यार्थ्यांसारखे वाटतात. काहींना दादांनी ज्या पद्धतीनं ड्रेस घातलाय आणि ज्या पोजिशनमध्ये पाय ठेवलेत ते नेते कमी आणि अधिकारी जास्त वाटतायत. एखाद्या देशाच्या प्रमुखासमोर अधिकारी, डिप्लोमॅट वर्ग ज्यापद्धतीनं आसनस्थ होतो तसेच अजित पवार बसल्याचं नेटकऱ्यांना वाटतं आहे. तसेही अजित पवार हे शिस्तप्रिय म्हणूनच ओळखले जातात. ते त्यांच्या ह्या फोटोतही पहायला मिळतं आहे.

विशेष म्हणजे अशोकराव ज्यावेळेस स्वत:चा मुद्दा मोदींसमोर मांडतायत, त्यावेळेस अजित पवार त्यांच्याकडे लक्ष न देता, स्वत: आणलेल्या फाईलमध्ये गुंतलेले आहेत. म्हणजेच एक तर अजित पवार त्यांना काय बोलायचं आहे त्याची तयारी करतायत नजर फिरवतायत किंवा त्यांचं बोलून झाल्यानंतर आपण जे काही बोललोत ते पूर्ण झालंय का याची चाचपणी करताना दिसतायत. पण हा फोटो बैठकीला सुरुवात झाल्यानंतर लगेचच काढला असावा असं दिसतं आहे. अजित पवार बोलण्याचीच तयारी करत असावेत असा अंदाज जास्त बांधला जातोय.

हेडमास्टरच्या भूमिकेत मुख्यमंत्री

ह्या फोटोत मुख्यमंत्र्यांच्या हातात एकही फाईल नाही. याचाच अर्थ असा की, जे काही प्रश्न घेऊन मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले, त्याची मुद्देसुद मांडणी करण्याची जबाबदारी त्यांनी सोबत घेऊन गेलेल्या अशोकराव, अजित पवारांवर होती असं दिसतं आहे. मुख्यमंत्र्यांची देहबोली त्या हेडमास्टरसारखी आहे, जो आपले दोन हुशार विद्यार्थी एखाद्या स्पर्धेसाठी घेऊन जात असेल. अशोकराव बोलत असताना मुख्ममंत्र्यांची पूर्ण नजर ही त्यांच्यावरच आहे. ते व्यवस्थित बोलतायत की नाही हेही ते पहात असावेत. एखादा मुद्दा सुटला किंवा लक्षात आला नाही तर तो मांडण्याच्या जबाबदारीत मुख्यमंत्री दिसतायत. ह्या फोटोत नेटकऱ्यांना हेच दिसतं आहे.

‘त्या’ पेंटिंगचीही तेवढीच चर्चा

ह्या फोटोतल्या चार नेत्यांची जशी चर्चा आहे तशीच पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंच्या मधोमध भिंतीवर असलेल्या पेंटीगचीही तेवढीच चर्चा आहे. महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला मोदींनी जिथं भेट दिली तिथेच मोदी इतर देशांच्या प्रमुखांनाही भेटत असतात. त्यावेळेस आणि आताही ती पेंटिग तशीच आहे. ती एका झाडाची पेटिंग आहे. त्यात निळा, ग्रे, पांढऱ्या रंगाचा वापर केला गेला आहे. मिटींग रुमचा जो अँबियन्स आहे त्याला ती पेंटिंग तंतोतंत जुळते. हा फोटो पहाताच रुमचा एकूणच सेन्स हा एकाच वेळेस आधूनिक आणि पारंपारिक असल्याचा फिल येतो. पाठीमागे ज्यावेळेस अभिनेता अनिल कपूर हा पंतप्रधानांना याच ठिकाणी भेटला होता त्यावेळेस नेटकऱ्यांनी ती पेटींगच बदलून तिथं दुसरीच पेटींग दाखवत मिम्स तयार केलेले होते. आताही नेत्यांच्या ह्या भेटीत ती पेंटिग नेटकऱ्यांच्या नजरेतून सुटलेली नाही.

(Cm Uddhav thackeray DCM Ajit Pawar And Minister Ashok Chavan Dressing Sence And photo With pm Modi At New Delhi)

हे ही वाचा :

VIDEO: मोदी-ठाकरे एकांतात भेटले; ‘ते’ 30 मिनिटे महाराष्ट्राच्या राजकारणाची कूस बदलणार?

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली?, वाचा महत्त्वाचे आणि मोठे 10 मुद्दे

चर्चा तर होणारच! पंतप्रधानांनी कुणाच्याही मध्यस्तीशिवाय महाराष्ट्राच्या प्रश्नात लक्ष घातलं- संजय राऊत