होय, उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत : संजय राऊत

भाजपशी फारकत घेऊन राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत.

होय, उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत : संजय राऊत
Follow us
| Updated on: Feb 20, 2020 | 11:59 PM

मुंबई : भाजपशी फारकत घेऊन राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत (Uddhav Thackeray going to meet Narendra Modi). याबाबत स्वतः शिवसेनेचे संसदीय नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. तसेच ही सदिच्छा भेट असल्याचं म्हणत या भेटीच्या तपशिलात खोल शिरण्याची गरज नसल्याचंही राऊत म्हणाले.

संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या (21 फेब्रुवारी) दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत. ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही. जय महाराष्ट्र.”

महाराष्ट्रात सत्तास्थापन करुन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते सर्वात आधी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरेंच्या या दिल्ली दौऱ्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे या सदिच्छा भेटीमागील नेमकं कारण काय असा प्रश्न विचारला जात आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासह सत्तेतील 50-50 फॉर्म्युल्यावरुन शिवसेनेने भाजपसोबत फारकत घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह यांच्यावर विश्वासघात केल्याचा आणि खोटं बोलल्याचा गंभीर आरोपही केला होता.  यानंतर शिवसेनेकडून आणि भाजपकडून एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. यात भाजपकडून शिवसेनेच्या हिंदुत्वावरही सडकून टीका करण्यात आली. तसेच सत्तेसाठी शिवसेना लाचार झाल्याचीही टीका करण्यात आली. या सर्व टीकेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहेत. या भेटीत काय चर्चा होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या:

Uddhav Thackeray going to meet Narendra Modi

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.