Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election 2022: नाश्ता झाला, घोषणा झाल्या, पायी आले, तीन तास झाले तरीही शिवसेनेच्या आमदाराचं मतदान नाही; नेमकं कुठे खुट्ट् झालं?

Rajya Sabha Election 2022: शिवसेनेच्या सर्व आमदारांना आणि अपक्ष आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. आज राज्यसभेचं मतदान असल्याने सर्व आमदार सकाळी लवकरच उठले. काहींनी उठल्यावर योगा केला, तर काहींनी व्यायाम केला.

Rajya Sabha Election 2022: नाश्ता झाला, घोषणा झाल्या, पायी आले, तीन तास झाले तरीही शिवसेनेच्या आमदाराचं मतदान नाही; नेमकं कुठे खुट्ट् झालं?
तीन तास झाले तरीही शिवसेनेच्या आमदाराचं मतदान नाही; नेमकं कुठे खुट्ट् झालं?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 11:59 AM

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajyasabha Election) मतदान सुरू झालं. सकाळी 9 वाजता मतदानाला सुरुवात झाली. 11.30 वाजेपर्यंत 187 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात भाजप, राष्ट्रवादी (ncp)  आणि काँग्रेससह अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. मात्र, तीन तास होत आले तरी शिवसेनेच्या एकाही आमदाराने अजून मतदान केलं नाही. शिवसेना (Shivsena) समर्थक अपक्ष आमदारांनीही मतदान केलं नाही. शिवसेनेचे सर्वच आमदार विधानभवनात पोहोचून अर्धा तास लोटला आहे. पण तरीही आमदारांनी मतदान केलं नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने ऐनवेळी मतांचा कोटा वाढवल्याने शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता विधानभवनात आले असून आपल्या आमदारांशी चर्चा करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेच्या सर्व आमदारांना आणि अपक्ष आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. आज राज्यसभेचं मतदान असल्याने सर्व आमदार सकाळी लवकरच उठले. काहींनी उठल्यावर योगा केला, तर काहींनी व्यायाम केला. तर काहींनी ध्यानधारणा केली. त्यानंतर सर्व आमदार तयार होऊन नाश्याताला एकत्र आले. कुणी मसाला डोसा, कुणी ऑमलेट तर कुणी इडली, डोश्यावर ताव मारला. त्यानंतर काही आमदारांनी मीडियाशी संवादही साधला. इतक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मतांचा कोटा वाढवल्याची बातमी आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारासाठी 42 ऐवजी 44 मतांचा कोटा ठरवल्याची बातमी धडकली. त्यामुळे शिवसेना आमदारांच्या गोटात एकच खळबळ उडाली.

हे सुद्धा वाचा

घोषणा देत विधानभवनाकडे कूच

या वृत्तानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी आमदारांना समजावण्याचा प्रयत्न केला. स्वत: संजय राऊत आणि विनायक राऊत हॉटेलात आले. त्यांनी आमदारांशी संवाद साधला. त्यानंतर सर्व आमदार विधानभवनाच्या दिशेने जायला निघाले. हाकेच्या अंतरावरच विधानभवन असल्याने पायीच जात शक्तीप्रदर्शन करायचं ठरलं. तर अब्दुल सत्तार यांनी गाडीने जायचं ठरलं. यावेळी शिवसेना आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. जय भवानी, जय शिवाजीचा जयघोषही झाला. त्यामुळे आता शिवसेनेचे आमदार एकत्रित मतदान करणार असं चित्रं दिसत होतं.

राष्ट्रवादी 10 मते देणार

शिवसेना आमदार घोषणा देतच विधान भवनात आले. पण मतदान कक्षाकडे फिरकलेच नाही. या आमदारांना थांबायला सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफाही विधानभवनात आला. मुख्यमंत्र्यांनी आमदारांशी चर्चा सुरू केली आहे. मात्र, ही चर्चा सुरू असतानाच शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी पहिल्या पसंतीची दहा मते देणार असल्याचं वृत्त धडकलं. मात्र, तरीही अजून शिवसेना आमदारांचं मतदान सुरू झालेलं नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.