सचिन वाझेंचा मुक्काम ‘वर्षा’वर होता, नारायण राणेंचा गौप्यस्फोट!

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बप्रकरणात गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अथवा देऊ नये हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. (cm uddhav thackeray must resign first, says narayan rane)

सचिन वाझेंचा मुक्काम 'वर्षा'वर होता, नारायण राणेंचा गौप्यस्फोट!
नारायण राणे, भाजप नेते
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 11:38 AM

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बप्रकरणात गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अथवा देऊ नये हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. पण या प्रकरणात झालेल्या आरोपाने महाराष्ट्राची बदनामी झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ भाजप नेते नारायण राणे यांनी केली. (cm uddhav thackeray must resign first, says narayan rane)

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आज पुन्हा एकदा ठकारे सरकारवर हल्लाबोल केला. सचिन वाझेंना पोलीस खात्यात आम्ही आणलं नाही, असं अनिल देशमुख आणि परमबीर सिंगही म्हणत आहेत. म्हणजेच वाझेंना पोलीस खात्यात मुख्यमंत्र्यांनी आणल्याचं स्पष्ट होत आहे. सिंग यांचा रोख थेट मुख्यमंत्र्यांच्या दिशेने आहे. वाझे हे मुख्यमंत्र्यांसाठीच काम करत होते. तेच त्यांचे वाझेंचे गॉडफादर आहेत. हिरेन यांना मारण्याचं पाप वाझेंनीच केलं आहे. वाझे सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देत होते. त्यामुळे वाझे हे मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शक होते का? असा सवाल करतानाच या प्रकरणात गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या अथवा नका घेऊ, फम पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी राणे यांनी केली.

वाझे वर्षावर राहत होते

सचिन वाझे कुठे राहत होते हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे. वाझे वर्षा निवासस्थानी आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये राहत होते. वर्षावर राहून वाझे सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देत होते, असा गौप्यस्फोटही राणे यांनी केला. वाझे काय करत होते. त्यांचे काय उद्योग होते, हे सर्व मुख्यमंत्र्यांना माहीत होतं, असंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी काळीमा फासला

राज्यात पैसे द्या आणि मुडदे पाडा असा कारभार सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असं सांगतनाच वाझेंची चौकशी होत आहे. आता गृहमंत्र्यांचीही होईल. राज्याला मुख्यमंत्र्यांनी काळीमा फासला आहे. असा बेजबाबदार मुख्यमंत्री पूर्वी झाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकक्षणही खुर्चीवर राहू नये, असं ते म्हणाले. परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांबाबत मुख्यमंत्र्यांना आधी कळवलं होतं. मग मुख्यमंत्र्यांनी कारवाई का केली नाही? असा सवालही त्यांनी केला. (cm uddhav thackeray must resign first, says narayan rane)

संबंधित बातम्या:

मनसुख हिरेन आत्महत्येप्रकरणी दोन जणांना अटक, एटीएसची मोठी कारवाई

शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये?, मोजक्याच नेत्यांशी चर्चा करणार; देशमुख दिल्लीला जाणार की नाही?

‘आबा आज तुम्ही गृहमंत्री असायला हवं होतं, तुमची खूप आठवण येतेय’

(cm uddhav thackeray must resign first, says narayan rane)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.