राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, फिजीओथोरेपी व्यवस्थित सुरु असल्याची दिली माहिती
आजारपणातदेखील उद्धव ठाकरे अॅक्श्न मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले. ते आज (25 नोव्हेंबर) सह्याद्री अतिथीगृह (Sahyadri Guest House) येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. मुख्यमंत्री हे एच.एन.रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) याच्यावर मान आणि मणक्याच्या दुखण्यासंदर्भात शस्त्रक्रिया (Surgery) करण्यात आली. सध्या त्यांच्यावर फिजीओथेरेपी सुरु असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. या पार्श्वभूमीवर आजारपणातदेखील उद्धव ठाकरे अॅक्श्न मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले. ते आज (25 नोव्हेंबर) सह्याद्री अतिथीगृह (Sahyadri Guest House) येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. मुख्यमंत्री हे एच.एन.रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.
‘सहकार्य करीत आहात त्यासाठी धन्यवाद, फिजीओथेरपी व्यवस्थित सुरू’
यावेळी बैठकीदरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. “या आजारपणात आपण सर्व जण सहकार्य करीत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली फिजीओथेरपी व्यवस्थित सुरू आहे;” असे ते म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर घेण्यात आलेल्या निर्णयांची दिली माहिती
यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत कोविड परिस्थिती, लसीकरण, पीक-पाणी परिस्थिती आदी विषयांवर चर्चा झाली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी संपासंदर्भात राज्य शासनाने उचललेल्या पावलांची माहिती मंत्रिमंडळास दिली.
युरोपात कोरोना वाढतोय, काळजी घेण्याची गरज
कोविड परिस्थिती युरोपमध्ये बिकट होत आहे. तेथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच कारणामुळे राज्यातदेखील आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत या बैठकीत सर्व मंत्र्यांनी मांडले. महाराष्ट्रात पुरेशी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे. कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच चाचण्या वाढवाव्यात. कोविडचा धोका पूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे आरोग्याचे नियम पाळण्यासाठी सर्वानी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत, अशी चर्चा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाली.
आज (25 नोव्हेंबर) सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. मुख्यमंत्री हे एच.एन.रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.
इतर बातम्या :
‘गृहपाठ न केल्यानं तोंडघशी पडावं लागलं’, एसटी कर्मचारी आंदोलनावरुन राजू शेटींचा सदाभाऊंना टोला
पहिले ते बारावी सरसकट सर्व वर्ग सुरु होणार, नेमके कोणते नियम पाळले जाणार, काय काळजी घेतली जाणार?