मी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प नाही, माझ्या डोळ्यांसमोर माझी माणसं तळमळताना पाहू शकत नाही : उद्धव ठाकरे

| Updated on: Jul 22, 2020 | 9:37 PM

शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे (CM Uddhav Thackeray says I am not Donald).

मी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प नाही, माझ्या डोळ्यांसमोर माझी माणसं तळमळताना पाहू शकत नाही : उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे (CM Uddhav Thackeray Saamna interview). या मुलाखतीचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या प्रश्नांना रोखठोक उत्तर देताना दिसत आहेत (CM Uddhav Thackeray Saamna interview).

या टीझरमध्ये “मी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प नाही. माझ्या डोळ्यांसमोर माझी माणसं तळमळताना पाहू शकत नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणताना दिसत आहेत. या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षांच्या परीक्षा, लॉकडाऊन या विषयांवर सविस्तर भाष्य केलं आहे (CM Uddhav Thackeray says I am not Donald).

अंतिम परीक्षेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री काय म्हणाले?

टीझरमध्ये उद्धव ठाकरे अंतिम वर्षाच्या परीक्षेवरदेखील उत्तर देताना दिसत आहेत. मात्र, त्यांचं सविस्तर उत्तर संपूर्ण मुलाखत प्रदर्शित झाल्यावरच बघायला मिळेल. “सरकार म्हणून आम्ही परीक्षा घेणार. परीक्षा व्हावी असं माझंही मत आहे. पण…”, असं उद्धव ठाकरे टीझरमध्ये बोलताना दिसले. ही संपूर्ण मुलाखत या आठड्याच्या शेवटी 25 आणि 26 जुलै रोजी ‘सामना’तून प्रदर्शित होणार आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत लॉकडाऊनवरही भाष्य केलं आहे. “राज्यात लॉकडाऊन सुरुच आहे. आपण एक-एक गोष्टी सोडवत चाललो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, ‘सामना’च्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर या मुलाखतीचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये संजय राऊत मुख्यमंत्र्यांना कोरोना बरोबर जगायला शिकले आहात का? असा सवाल करताना दिसत आहेत. त्यावर “सगळ्यांनी शिकायला हवं, शहाणं व्हायचं की नाही हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. पण शहाणं व्हायचा आपण तरी प्रयत्न करु”, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं.

“हे सहा महिने विविध आव्हांनाचे होते. कोरोना संकट अजूनही संपता संपत नाही. हे रण कधी सरणार? हेच कळत नाही”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.