मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे काहीतरी शिजत असल्याचं बोललं जात आहे. कारण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट होत आहे. शनिवारीही संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज दुसऱ्यांदा राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत. याची पार्श्वभूमीवर शिवसेना मंत्री आणि आमदारातील नाराजी, त्याचबरोबर शरद पवार यांचा एखादा निरोप घेऊन राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असण्याची शक्यत्या व्यक्त केली जात आहे. (ShivSena MP Sanjay Raut meets CM Uddhav Thackeray at Varsha bungalow)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजधानी दिल्लीमध्ये 30 मिनिटे वैयक्तिक भेट झाली होती. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा सत्ता बदलाच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार पूर्ण 5 वर्षे टिकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर संजय राऊतही सातत्याने सरकारला धोका नसल्याचं सांगतात. मात्र, असं असलं तरी शिवसेनेतील नेते आणि मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राकडे पाहिलं जात आहे.
प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना काही दिवसांपूर्वी एक पत्र लिहिलं आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून शिवसेनेला कमकुवत करण्याचं काम सुरु असल्याचा खळबळजनक दावा केला होता. तसंच भाजपसोबत पुन्हा एकदा जुळवून घेण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यानंतर भाजप नेत्यांकडून ही केवळ प्रताप सरनाईक नाही तर शिवसैनिकांचीही भावना असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला होता. तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या ससेमिऱ्यामुळे सरनाईक यांनी अशाप्रकारचं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिल्याचं महाविकास आघाडी नेते बोलत होते.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी प्रताप सरनाईक यांच्याबाबत लवकरच तुम्हाला बातमी मिळेल, असे सूचक वक्तव्य राऊत यांनी केलं होतं. प्रताप सरनाईकांशी दोन दिवसांपूर्वी फोनवरुन बोललो, त्यांनी खुलासा केला, मी माझ्या भावना व्यक्त केल्या. त्या व्यक्त करत असताना सरनाईकांनी स्पष्टपणे सांगितलं मी आजन्म शिवसेनेतच राहीन, आणि शिवसेनेतच मरेन. प्रताप सरनाईकांबाबत लवकरच तुम्हाला बातमी मिळेल, असं राऊत यांनी म्हणाले होते.
जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकांना 6 महिने मुदतवाढ द्या, राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका https://t.co/9PR4ZHZFWq @OfficeofUT @CMOMaharashtra @VijayWadettiwar @cbawankule #OBCReservation #MahaVikasAghadi #SupremeCourt #ZillhaParishad #PanchayatSamiti #ByElection
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 28, 2021
संबंधित बातम्या :
संजय राऊत मातोश्रीवर, मुख्यमंत्र्यांना भेटताय का? राऊत म्हणाले शिवसेना पक्षप्रमुखांना भेटतोय!
देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राला गरज, त्यांचं भविष्य उज्ज्वल, मी स्वत: त्यांना भेटेन : संजय राऊत
ShivSena MP Sanjay Raut meets CM Uddhav Thackeray at Varsha bungalow