एकनाथ शिंदेंचं कौतुक, त्यांनी मदत तरी केली, उद्धवजी कपड्याची इस्त्री न मोडता कोकणातून परतले,भाजपचे टोमणे
उद्धव ठाकरे केवळ चिवला बीचवर जाऊन माघारी फिरले. चिवला बीचवर ते राणे साहेबांचं घर पाहायला आले होते का? कदाचित त्यांचं आमच्यावरील प्रेम आजही कमी झालेलं नाही. कारण याठिकाणी ते खूप दिवस राहिले आहेत| Nitesh Rane CM Uddhav Thackeray
मुंबई: तौक्ते चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले. उद्धव ठाकरे हे कोकणात जाण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र, कपड्याची इस्त्रीही मोडून न देता ते मुंबईत परतले. याउलट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोकणवासियांना मदत तरी पाठवली. त्यासाठी मी एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक कसा असतो, हे त्यांनी दाखवून दिले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावे, हा माझा मैत्रीपूर्ण सल्ला असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले. (BJP MLA Nitesh Rane slams CM Uddhav Thackeray)
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा वेग चक्रीवादळाला लाजवणारा, उद्धव ठाकरे खरंच बेस्ट सीएम : मनसे
नितेश राणे यांनी शनिवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधला. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर भाष्य केले. उद्धव ठाकरे केवळ चिवला बीचवर जाऊन माघारी फिरले. चिवला बीचवर ते राणे साहेबांचं घर पाहायला आले होते का? कदाचित त्यांचं आमच्यावरील प्रेम आजही कमी झालेलं नाही. कारण याठिकाणी ते खूप दिवस राहिले आहेत, आमच्याबरोबर जेवले आहेत. त्यामुळे त्यांना बघायचे असेल की, राणेंच्या घराला तर काही नुकसान झाले नाही ना, असा टोला नितेश यांनी लगावला.
मुख्यमंत्री वायरीत गेले नाहीत, निवतीत गेले नाहीत ज्या भागात सर्वात जास्त नुकसान झाले त्या वैभववाडी, देवगडकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे मुळात याला दौरा म्हणू शकता का ? देवेंद्रजी कोकणात फिरता हेत, मी घरी बसून राहिलो तर उद्या मला उत्तर द्यावी लागतील म्हणून उद्धव ठाकरेंनी हा दौरा केला का, असा प्रश्नही नितेश यांनी उपस्थित केला.
मग केंद्र सरकारला सांगा राज्य सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लावा; नितेश राणेंचा टोला
तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही फटका बसल्याने केंद्राने राज्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. उद्धवजींनी केंद्राकडे सारखे मदतीचे रडगाणे गात बसू नये. त्यापेक्षा राज्य सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही, असं थेट केंद्राला सांगा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
नितेश राणे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. कोल्हापूरमध्ये आलेल्या आपत्तीच्यावेळी केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारनेही मदत केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सारखं केंद्राकडे मदतीचे रडगाणे गात बसू नये. कालपासून राज्यातील सर्वच मंत्री केंद्राच्या मदतीची टेप वाजवत आहेत. त्यापेक्षा केंद्र सरकारला राज्य सरकार बरखास्त करायला सांगा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. राज्य चालवण्याची आमची क्षमता नाही हे केंद्राला कळवा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
संबंधित बातम्या:
हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरुन पाहणी करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे दोघांमध्येही जनतेला भविष्य दिसत नाही; मनसेचा हल्लाबोल
(BJP MLA Nitesh Rane slams CM Uddhav Thackeray)