VIDEO: थोरात साहेब, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ; मुख्यमंत्र्यांचे काँग्रेस नेत्यांना चिमटे

काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना चिमटे काढले आहेत. (cm uddhav thackeray)

VIDEO: थोरात साहेब, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ; मुख्यमंत्र्यांचे काँग्रेस नेत्यांना चिमटे
cm uddhav thackeray
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 12:01 PM

मुंबई: काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना चिमटे काढले आहेत. थोरात साहेब, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा. आम्ही स्वबळावर जेवायला येऊ, असा चिमटाच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना काढला आहे. (cm uddhav thackeray taunts congress over contesting alone)

जलसंवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जलभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आघाडीचे मंत्री उपस्थित होते. यावेळी अजित पवारांचं भाषण झालं. या भाषणात पवारांनी जेवणाचा विषय काढला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले. यावेळी त्यांनी अजितदादांच्या भाषणातील जेवणाचा धागा पकडून जोरदार बॅटिंग केली. दादा तुम्ही जेवणाचा विषय काढला. थोरात साहेब म्हणाले कोरोनामुळे जमलं नाही. थोरात साहेब, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा. कोरोनाची भीती बाळगू नका. आम्ही तुमच्याकडे येऊन स्वबळावर जेवू, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना काढताच सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लगेच सारवासारव केली. स्वबळाचा अर्थ असा नका समजू. म्हणजे आम्ही न भिता जेवायला येऊ. नाही तर उद्या जेवणावरून आघाडीत बिघाडी असं काही छापून यायचं, असं काही नाही. हा गंमतीचा भाग आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पवार म्हणाले, तुम्ही खरच एकटं लढणार आहात का?

काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. या चारही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याचं कळतं. या बैठकीत ओबीसींच्या आरक्षणावर चर्चा झाली. त्यानंतर राज्य सरकारचा कारभार आणि एकूण तीन पक्षातील वादावर चर्चा झाली. त्याचवेळी पवारांनी एक महत्त्वाचा प्रश्न या तिन्ही काँग्रेसच्या नेत्यांना केला. तुम्ही खरंच एकटं लढणार आहात का? तसं स्पष्ट सांगा. नाना पटोलेंना दिल्ली हायकमांडने काही अधिकार दिले आहेत का?, असा सवाल पवारांनी या तिन्ही नेत्यांना केला, असं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

काँग्रेस नंबर वन असेल

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्वबळावर लढण्यासंदर्भात आम्ही चर्चा करू… आमच्या पक्षाने जो निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ… महाराष्ट्र काँग्रेसचं राज्य आहे… भविष्यात तुम्हाला कळेल, 2024 मध्ये काँग्रेस राज्यात एक नंबरचा पक्ष असेल”, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

काँग्रेसची फरफट

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिथे नेमकी काय चर्चा झाली. हे माहीत नाही. पटोले यांनी त्यांच्या मनातील आणि कार्यकर्त्यांच्या मनातील भावना सांगितली. कितीही काही केलं काहीही दाखवण्याचा प्रयत्न केला तरी तिन्ही पक्षात अंतर्गत काय चाललं हे लोकांना कळून चुकलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी एका बाजूला असून काँग्रेस एकटी पडलेली दिसत आहे. काँग्रेस फरफटत जात आहे की काय असं दिसत आहे, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला. (cm uddhav thackeray taunts congress over contesting alone)

संबंधित बातम्या:

पवार म्हणतात, ‘नाना छोटे माणूस’, राऊत म्हणाले, ‘लहाण माणसेही राजकारण ढवळून काढतात, नानांच्या कार्यकुशलतेची हीच पोचपावती!’

…म्हणून नाना पटोले यांचे फोन चोरुन ऐकण्यात आले, संजय राऊतांनी सांगितलं कारण!

नाना रांगडे गडी, ते काय बोलतात आणि कसे डोलतात यावर सरकारचं भवितव्य अवलंबून नाही : संजय राऊत

(cm uddhav thackeray taunts congress over contesting alone)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.