उत्तराखंडच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातही व्हॅली ऑफ फ्लॉवर्सची संकल्पना, अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यानी दिल्या सूचना!
आपण शहरामध्ये नेहमीच बघतो की, शासकिय भूखंड रिकामे पडलेले असतात. वनांचा विकास शहरामधील हरित क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने या भूखंडांवर विविध फुलांची झाडे लावण्याचे निर्देशही देण्यात आले. इतकेच नाहीतर उद्धव ठाकरे यांनी पक्ष्यांची अन्नसाखळी टिकून राहण्यासाठी विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा वावर वाढेल यावरही अभ्यास करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मुंबई : उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स (Valley of Flowers) जगप्रसिध्द आहे. येथील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स बघण्यासाठी पर्यटक नेहमीच गर्दी करतात. महाराष्ट्रातूनही अनेक पर्यटन उत्तराखंडमध्ये खास व्हॅली ऑफ फ्लॉवर्स बघण्यासाठी जातात. आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही (Maharashtra) व्हॅली ऑफ फ्लॉवर्स तयार केले जाऊ शकते का? यावर वन विभागाला अभ्यास करण्याच्या सूचना स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. महाराष्ट्रात आपण बघितले असेल की, विविध ऋतूंमध्ये डोंगरावर रंगीबिरंगी फुले फुलतात. विशेष म्हणजे पावसाचे (Rain) आगमन झाले की, डोंगऱ्यांवर फुलांचा बहर येतो.
हरित क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल
आपण शहरामध्ये नेहमीच बघतो की, शासकिय भूखंड रिकामे पडलेले असतात. वनांचा विकास शहरामधील हरित क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने या भूखंडांवर विविध फुलांची झाडे लावण्याचे निर्देशही देण्यात आले. इतकेच नाहीतर उद्धव ठाकरे यांनी पक्ष्यांची अन्नसाखळी टिकून राहण्यासाठी विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा वावर वाढेल यावरही अभ्यास करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रायगड, कोल्हापूर, ठाणे, नागपूर या किल्ल्याच्या परिसरामध्ये हवाई बीज पेरणीअंतर्गत करण्यात आलीये, याची माहिती देखील देण्यात आलीये. तसेच यंदा हवाई पेरणी संदर्भात असलेले नियोजन देखील उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आले.
हवाई पेरणीमध्ये या भागांमध्ये केली जाईल
हवाई पेरणीमध्ये अशा डोंगऱ्यांची निवड करण्यात आलीये, जिथे मानसांचा सहवास अत्यंत कमी आहे. शिवाय तिथे मुबलक प्रमाणात पाणी आणि माती आहे. ज्यामुळे झाडे येण्यास मदत होईल. वनामध्ये म्हणावी तशी झाडे उरलेली नाहीयेत आणि पाणी देखील मिळत नसल्यामुळे प्राणी हे मानव वस्तीकडे वगळत आहेत. मग प्राण्याचे मानवावर हल्ले हे आपण नेहमीच ऐकतो. मात्र, मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी बफर क्षेत्रात ग्रासलॅण्ड वाढवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यामुळे वन्य जीवांचे मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण कमी होईल.