महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची मोठी भूमिका, मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मार्गदर्शक हरपला, अशा शब्दात अहमद पटेल यांना आदरांजली अर्पण केली आहे.

महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची मोठी भूमिका, मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 1:47 PM

मुंबई : काँग्रेसचे चाणाक्य म्हणून ओळखले जाणारे दिग्गज नेते अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. देशातील विविध नेते त्यांच्या आठवणी जागवत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मार्गदर्शक हरपला, अशा शब्दात अहमद पटेल यांना आदरांजली अर्पण केली आहे. (Cm Uddhav Thackeray Tribute Ahmed Patel)

ज्येष्ठ अनुभवी नेते अहमद पटेल यांच्या निधनाने कॉंग्रेसने ‘चाणक्य’ गमावला आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची देखील मोठी भूमिका होती. अहमद पटेल हे कॉंग्रेस पक्षाचे चाणक्य समजले जात, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पक्षाला प्रत्येक प्रसंगात त्यांचा आधार होता. केवळ राजकीय आघाडीवरच ते सक्रीय होते असे नव्हे तर अनेक सामाजिक कार्यांशी त्यांचा जवळून संबंध होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना अहमद पटेल यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला. त्यांच्या निधनाने कॉंग्रेस तसेच महाविकास आघाडीने देखील आपला मार्गदर्शक गमावला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

अहमद भाई ये आपने क्या किया…?- संजय राऊत 

अहमदभाईंच्या जाण्याने काँग्रेसचा भक्कम स्तंभ कोसळला. ज्यावेळी गांधी घराण्याला अहमदभाईंची खरी गरज होती त्यावेळीच अहमदभाई सोडून निघून गेले. अहमदभाईंचं जाणं अत्यंत दुखःद आणि धक्कादायक आहे. आज खरी गरज असताना अहमद पटेल सोडून केले. अहमद भाई आपने ये क्या किया?… एका विनम्र नेत्याला विनम्र श्रध्दांजली..

अहमद पटेल यांचा अल्प परिचय

अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू म्हणमून ओळखले जायचे. सोनिया गांधींना राजकारणात स्थिरावण्यासाठी पटेल यांनी मोठी मदत केली. गांधी कुटुंबासह काँग्रेसविषयी खडान्-खडा माहिती अहमद पटेल यांना होती. तसंच जेव्हा पक्षहिताचा प्रश्न यायचा, तेव्हा सोनिया गांधी अहमद पटेल यांचा सल्ला अंतिम मानायच्या. एकूणच गांधी कुटुंब आणि काँग्रेसमध्ये अहमद पटेल यांना मानाचं स्थान होतं. महत्त्वाच्या पदांपेक्षा पक्षसंघटनेला त्यांनी नेहमीच प्रथम स्थान दिलं.

त्यांच्या जाण्याने काँग्रेसची मोठी हानी झालीये. देशभरात काँग्रेसची पिछेहाट होताना त्यांच्या अकाली जाण्याने काँग्रेस नेत्यांना तसंच कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसलाय. ट्विटर, फेसबुकद्वारे नेते, कार्यकर्ते पटेल यांच्याप्रति आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

(Cm Uddhav Thackeray Tribute Ahmed Patel)

संबंधित बातम्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अहमद पटेल यांचे निधन, मुलगा फैजल पटेल यांची ट्विटरद्वारे माहिती

…जेव्हा इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचीही ऑफर अहमद पटेलांनी नाकारली!

‘लडका छोटा हैं तो क्या हुआ?, बडा हमें ही करना हैं’, सत्यजीत तांबेंसाठी अहमद पटेलांचा थेट ठाकरेंना फोन

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.