सरकारला जनतेचे आशीर्वाद! ईडी, सीबीआयची भीती कुणाला दाखवता?; ईडीच्या कारवाईवर मुख्यमंत्र्यांचा रोखठोक सवाल
राज्यातील काही प्रकरणात ईडी आणि सीबीआयने कारवाई सुरू केली असून त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. (Cm Uddhav Thackeray Warns Bjp Against Misuse Of Ed Cbi)
मुंबई: राज्यातील काही प्रकरणात ईडी आणि सीबीआयने कारवाई सुरू केली असून त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. सरकारला जनतेचे आशीर्वाद आहेत. ईडी आणि सीबीआयची भीती कुणाला दाखवता?, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. (Cm Uddhav Thackeray Warns Bjp Against Misuse Of Ed Cbi)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दैनिक ‘सामना’साठी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सीबीआय आणि ईडीच्या कारवाईवरून केंद्र सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रदीर्घ मुलाखतीत सर्वच प्रश्नांना उत्तरे दिली. विरोधक सरकारवर करीत असलेल्या आरोपांचा कडक समाचार घेतला. सरकारने एक वर्ष पूर्ण केले. सरकार आज पाडू, उद्या पाडू असे बोलले त्यांचेच दात या काळात पडलेत, असा दणकाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला दिला. ‘ईडी’ वगैरेचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा. मुलाबाळांच्या मागे लागून विकृत आनंद मिळवणाऱ्यांनो, तुम्हालाही कुटुंब, मुलंबाळं आहेत हे विसरू नका; पण आमच्यावर संस्कार आहेत म्हणून संयम ठेवलाय, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी सीबीआयला राज्यात यायला परवानगीची अट का घातली याचा खुलासाही केला. सीबीआयचा दुरुपयोग होऊ लागतो तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची, असा सवालही त्यांनी केला.
तुम्ही धुतले तांदूळ नाहीत, तुमचीही खिचडी शिजवू शकतो
मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. नक्कीच नाही. कुटुंबीयांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो, असं त्यांनी विरोधकांना ठणकावलं.
एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू
तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची. सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू, असा इशाराही त्यांनी दिला. सूडाने वागायचंच आहे का? माझी आजही प्रामाणिक इच्छा आहे की, हे असं विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका. कारण विकृती ही विकृती असते. त्या मार्गाने जायची आमची आज तरी इच्छा नाही. आम्हाला भाग पाडू नका, असा इशाराही त्यांनी दिला.
आव्हान मिळतं तेव्हा स्फूर्ती येते
ईडीसारख्या संस्था… ज्या केंद्र सरकारच्या हातात आहेत. त्या संस्थांचा वापर महाविकास आघाडीच्या आमदारांवर धाडी घालून दहशतवाद आणि दडपशाही करताहेत. जेणेकरून आमदारांनी गुडघे टेकावेत, असं सांगतानाच मला जेव्हा आव्हान मिळतं तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. एक गोष्ट काही लोक विसरतात की, तुम्ही जो म्हणालात तो चमत्कार या महाराष्ट्राच्या मातीत आहे. तेज आहे. महाराष्ट्रावर अनेक संकटं आली. आपत्त्या आल्या. भलेभले अंगावर आले, पण काय झालं?, असंही त्यांनी सांगितलं. (Cm Uddhav Thackeray Warns Bjp Against Misuse Of Ed Cbi)
आमच्याकडे सुदर्शन चक्र आहे. आम्हीही मागे लावू शकतो
माझ्या दसऱ्याच्या भाषणात मी तेच बोललो होतो. माझ्या आजोबांच्या पहिल्या मेळाव्याच्या भाषणाचा संदर्भ दिला होता की, महाराष्ट्र मेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. वाघाची अवलाद आहे. महाराष्ट्राच्या वाटेला कुणी जाईल किंबहुना महाराष्ट्राला कोणी डिवचेल तर काय होतं याचे इतिहासात दाखले आहेत. भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील आणि अशी ही संकटं अंगावर घेत पचवून त्यांचा खात्मा करत महाराष्ट्र पुढे जात राहिला, महाराष्ट्र कधी थांबला नाही. महाराष्ट्र कधी थांबणार नाही. कुणी किती आडवे आले तरी त्या आडवे येणाऱ्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल. म्हणून महाराष्ट्राला आव्हानं देणाऱ्यांना माझं म्हणणं आहे की, अशी आव्हानं देऊन तुम्ही सूडचक्र करणार असाल तर सूडचक्रात आम्हाला जायची इच्छा नाही. पण तुम्ही तशी वेळ आणलीतच तर तुम्ही आम्हाला म्हणता ना हिंदुत्ववादी तर मग ठीक आहे. सूडचक्र तुमच्याकडे, आमच्याकडे सुदर्शन चक्र आहे. आमच्याकडे पण चक्र आहे. आम्हीही मागे लावू शकतो, असा इशारा देतानाच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Cm Uddhav Thackeray Warns Bjp Against Misuse Of Ed Cbi)
तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय
यावेळी त्यांनी तपास यंत्रणाचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला. माझं या सगळ्या घडामोडींवर लक्ष आहे. मी मागेही म्हटलं होतं की मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. नक्कीच नाही, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची “अभिनंदन मुलाखत” LIVE https://t.co/3eYkQ8mowc
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 27, 2020
संबंधित बातम्या:
मी नामर्द नाही, ‘ईडी’ वगैरेचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा, उद्धव ठाकरेंचा रोखठोक इशारा
‘सामना’च्या धमाका मुलाखतीपूर्वी नितेश राणेंचं ट्विट; उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर शेलक्या शब्दात टीका
(Cm Uddhav Thackeray Warns Bjp Against Misuse Of Ed Cbi)