CM Uddhav Thackeray: धर्मसकंट, तरीही उद्धव ठाकरे कुणालाही भेटणार नाहीत, बंडाबाबत कोणतीही मिटिंग घेणार नाहीत!

CM Uddhav Thackeray: शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री कोणतीही बैठक घेणार नाहीत. वर्षावर काही आमदार जातील. काही तांत्रिक कारणं पूर्ण करतील, असं राऊत यांनी सांगितलं.

CM Uddhav Thackeray: धर्मसकंट, तरीही उद्धव ठाकरे कुणालाही भेटणार नाहीत, बंडाबाबत कोणतीही मिटिंग घेणार नाहीत!
धर्मसकंट, तरीही उद्धव ठाकरे कुणालाही भेटणार नाही, बंडाबाबत कोणतीही मिटिंग घेणार नाही!
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 23, 2022 | 11:31 AM

मुंबई: अर्ध्याहून अधिक शिवसेना (shivsena) फुटलेली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) काही तरी रणनीती आखतील असं सांगितलं जात होतं. वर्षावरून मातोश्रीवर आल्यानंतर पक्षाच्या नेत्यांना भेटून ते काही तरी स्टॅटेजी आखतील असंही सांगितलं जात होतं. मात्र, पक्षासमोर धर्मसंकट उभं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोणतीही मिटींग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षातील बंडावर चर्चा करण्यासाठी कोणतीही बैठक ते घेणार नाहीत. तसेच या विषयावर कुणाशीही चर्चा करणार नाहीत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही ते भेटणार नसल्याचं सांगितलं जात आहे. काल त्यांची राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांची भेट झाली होती. यावेळी प्रदीर्घ चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी आपलं मनोगतही त्यांना कळवलं. त्यानंतर त्यांनी वर्षा निवासस्थान सोडलं. पवार यांच्याशी चर्चा करून त्यांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांनी आज कुणालाही न भेटण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं.

शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री कोणतीही बैठक घेणार नाहीत. वर्षावर काही आमदार जातील. काही तांत्रिक कारणं पूर्ण करतील, असं राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे मुख्यमंत्री आज कोणताही बैठक घेणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आज दिवसभरातील घटनाघडामोडींवर ते लक्ष ठेवून असणार असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, ज्या पद्धतीने वर्षा निवासस्थान सोडावं लागलं तो घाव उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागला असल्याचं सांगितलं जात आहे. काल त्यांच्या भाषणातूनही त्यांनी तसं बोलून दाखवलं होतं.

मुख्यमंत्री फक्त सचिवांशी बोलणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोणतीही राजकीय बैठक घेणार नाहीत. ते फक्त दुपारी 12 वाजता सर्वच खात्यांच्या सचिवांशी बोलणार आहेत. त्यांच्याशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. आभार मानण्यासाठी ते सचिवांशी बोलणार असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर दुपारी ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही देऊ शकतात, असंही सूत्रांनी सांगितलं.

निवडून येऊन दाखवावंच

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना चर्चेसाठी बोलावलं आहे. त्यांना आवाहन केलं आहे. त्यांनी यावं आणि बोलावं, असं राऊत म्हणाले. तसेच या आमदारांनी पुन्हा निवडून येऊनच दाखवावे, असं आव्हानच राऊत यांनी दिलं आहे.

आमच्या संपर्कात 20 आमदार

आमच्या संपर्कात 20 आमदार आहेत. ते मुंबईत येतील तेव्हा खुलासा होईल. तुम्ही माझ्या चेहऱ्यावर तणाव पाहिला का? अशा संकटाचा सामना करण्याचा आम्हाला अनुभव आहे. आम्ही वर्षानुवर्ष काम केलं आहे. केवळ बाळसााहेबांचं भक्त म्हणून शकत नाही. त्यासाठी तसं वागावं लागतं, असंही त्यांनी सांगितलं.