AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिंदू चौकात या, समोरासमोर चर्चा करु, चंद्रकांत पाटील यांचं चॅलेंज हसन मुश्रीफांनी स्वीकारलं!

ओबीसींचं राजकीय (OBC reservation) आरक्षण रद्द झाल्यानंतर आज भाजपने राज्यभर चक्काजाम आंदोलन (BJP Chakka Jam Andolan) केलं. भाजपच्या सर्व आघाडीच्या नेत्यांनी आपआपल्या भागात चक्का जाम करुन, ओबीसी आरक्षणाची मागणी केली.

बिंदू चौकात या, समोरासमोर चर्चा करु, चंद्रकांत पाटील यांचं चॅलेंज हसन मुश्रीफांनी स्वीकारलं!
चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 4:04 PM

कोल्हापूर : ओबीसींचं राजकीय (OBC reservation) आरक्षण रद्द झाल्यानंतर आज भाजपने राज्यभर चक्काजाम आंदोलन (BJP Chakka Jam Andolan) केलं. भाजपच्या सर्व आघाडीच्या नेत्यांनी आपआपल्या भागात चक्का जाम करुन, ओबीसी आरक्षणाची मागणी केली. कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात दाभोळकर कॉर्नरला हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. (Come to Kolhapurs Bindu Chowk, let’s discuss face to face on OBC reservation, maharashtra Minsiter Hasan Mushrif accepted BJP Chandrakant Patils challenge!)

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, जर भाजपने ओबीसी समाजाचे आरक्षण घालवले असा आरोप होत असेल, तर कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये (Kolhapur Bindu Chowk) कोणत्याही दिवशी चर्चेला तयार आहे. मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची समोरासमोर चर्चा होऊ दे, किमान त्यानंतर तरी जनतेच्या लक्षात येईल की ओबीसी आरक्षण नेमकं कुणामुळे रद्द झालं”

हसन मुश्रीफ यांचं उत्तर

चंद्रकांत पाटलांच्या या उत्तराला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं. भाजप सरकारच्या पाच वर्षातील नाकर्तेपणामुळे समाजाचं आरक्षण कसं गेलं आणि समाज रस्त्यावर कसा आला याचे पुरावे मंत्री भुजबळ यांच्याकडे आहेत. त्यामुळे चर्चा होऊनच जाऊदेत, आम्ही तयार आहोत, असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी दिलेलं आव्हान स्वीकारल्याचं मुश्रीफ म्हणाले.

आमच्या हातात सूत्रं द्या, आरक्षण मिळवून देतो : फडणवीस

ओबीसी आरक्षणासाठी भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सरकारविरोधात आज रस्त्यावर उतरले . नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पाडलं. यावेळी फडणवीसांनी सरकारवर तुफान हल्ला चढवला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय, पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

नागपूरमधल्या आंदोलनात फडणवीसांना ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. खास करुन त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या 

माझ्या हातात सूत्रं दिल्यास ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन : फडणवीस

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...