मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात 13 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजपच्या 8, शिवसेनेच्या 2 आणि रिपाइं-आठवले गटाच्या एका आमदाराने मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे माजी नेते जयदत्त क्षीरसागर यांचाही नव्याने मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्र्यांमध्ये सहभाग आहे.
13 जणांमध्ये 8 जण कॅबिनेट मंत्री असतील, तर 5 जण राज्यमंत्री असतील. पाहूया कुणाला कोणत्या दर्जाचं मंत्रिपदं दिले आहे :
कॅबिनेट मंत्री
राज्यमंत्री
राज्य मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) आज (16 जून) विस्तार झाला आहे. दोन ते तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections) येऊन ठेपल्याने, शेवटच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अत्यंत महत्त्व आलं आहे. नव्याने कुठल्या मंत्र्यांचा समावेश आणि कुठल्या विद्यमान मंत्र्याला बढती मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे होते.
त्यानुसार आज मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 13 जण मंत्रिपदाची शपथ घेतली. तर पाच विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात विशेष म्हणजे, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्याही गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली आहे.
काँग्रेसमधून आलेल्या विखे पाटलांना कॅबिनेट मंत्रीपद
लोकसभा निवडणुकीत मुलगा खासदार सुजय विखे पाटील यांना नगर दक्षिणमधून काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने, नाराज झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर भाजपचा हात पकडला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटलांना थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे. ते राज्याचे आगामी कृषिमंत्री असतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते, तसेच विधानसभेत विरोधी पक्षनेतेही ते होते.
जयदत्त क्षीरसागर यांनाही कॅबिनेट मंत्रिपद
दोन आठवड्यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्याही गळ्यात थेट कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात क्षीरसागर शपथ घेतली. क्षीरसागर यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद मिळणार आहे.
संबंधित बातम्या :
शिवसेनेला केवळ दोन कॅबिनेट मंत्रिपदं, दोन्ही राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्यांना!
जयदत्त क्षीरसागर…. महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश, आणि थेट कॅबिनेट मंत्रिपद