काँग्रेसची नववी यादी जाहीर, महाराष्ट्रातील 4 उमेदवार घोषित

Loksabha Election 2019 : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी नववी यादी जाहीर केली असून, या यादीत महाराष्ट्रातील चार उमेदवारांची नावं आहेत. काँग्रेसने चंद्रपुरातील उमेदवार बदलला असून, आता शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर उर्फ बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे आता उत्तर मुंबई  आणि पुणे या दोन मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्याचे बाकी आहे. काँग्रेसच्या नवव्या यादीतील चार उमेदवार […]

काँग्रेसची नववी यादी जाहीर, महाराष्ट्रातील 4 उमेदवार घोषित
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

Loksabha Election 2019 : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी नववी यादी जाहीर केली असून, या यादीत महाराष्ट्रातील चार उमेदवारांची नावं आहेत. काँग्रेसने चंद्रपुरातील उमेदवार बदलला असून, आता शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर उर्फ बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे आता उत्तर मुंबई  आणि पुणे या दोन मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्याचे बाकी आहे.

काँग्रेसच्या नवव्या यादीतील चार उमेदवार :

  1. अकोला – हिदायत पटेल
  2. रामटेक – किशोर उत्तमराव गजभिये
  3. चंद्रपूर – सुरेश धानोरकर उर्फ बाळू धानोरकर
  4. हिंगोली – सुभाष वानखेडे

चंद्रपुरातून बांगडेंऐवजी बाळू धानोरकर लढणार

चंद्रपुरात काँग्रेसने विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी बांगेड यांच्याबाबत नाराजी व्यक्त करुन, धानोरकरांना उमेदवारी देण्याबाबत मागणी केली होती. ती मागणी काँग्रेसच्या वरिष्ठांनी मान्य करुन, बाळू धानोरकर यांना नवव्या यादीत स्थान दिले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून चंद्रपुरातून आता बाळू धानोरकर हेच लढतील.

काँग्रेसचे आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार

  1. नंदुरबार – के. सी. पाडवी
  2. धुळे – कुणाल पाटील
  3. वर्धा – चारुलता टोकस
  4. यवतमाळ-वाशिम – माणिकराव ठाकरे
  5. मुंबई दक्षिण मध्य – एकनाथ गायकवाड
  6. शिर्डी – भाऊसाहेब कांबळे
  7. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – नवीनचंद्र बांदिवडेकर
  8. नागपूर – नाना पटोले
  9. गडचिरोली – नामदेव उसेंडी
  10. मुंबई उत्तर मध्य – प्रिया दत्त
  11. मुंबई दक्षिण – मिलिंद देवरा
  12. सोलापूर – सुशील कुमार शिंदे
  13. जालना : विलास औताडे
  14. भिवंडी : सुरेश टावरे
  15. औरंगाबाद : सुभाष झांबड
  16. लातूर : मच्छिंद्र कामत
  17. नांदेड : अशोक चव्हाण
  18. अकोला – हिदायत पटेल
  19. रामटेक – किशोर उत्तमराव गजभिये
  20. चंद्रपूर – सुरेश धानोरकर उर्फ बाळू धानोरकर
  21. हिंगोली – सुभाष वानखेडे

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.