LS Election 2024 : सूरतनंतर आता ‘या’ मतदारसंघात काँग्रेसला उमेदवाराने दिला दगा, भाजपामध्ये प्रवेश

LS Election 2024 : काँग्रेससोबत हे देशात काय चाललय? असंच म्हणाव लागेल. त्यांना आपलेच उमेदवार धोका देत आहेत. सूरत पाठोपाठ आणखी एक मतदारसंघात काँग्रेसला धक्का बसला आहे. सूरतमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या पलटीमुळे भाजपाच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा हा देशात पहिला विजय ठरला.

LS Election 2024 : सूरतनंतर आता 'या' मतदारसंघात काँग्रेसला उमेदवाराने दिला दगा, भाजपामध्ये प्रवेश
Akshay Bam
Follow us
| Updated on: Apr 29, 2024 | 1:38 PM

सूरत पाठोपाठ आणखी एक मतदारसंघात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. सूरतमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या पलटीमुळे भाजपाच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा हा देशात पहिला विजय ठरला. सूरतनंतर आता काँग्रेसला मध्य प्रदेशात धक्का बसला आहे. इंदूरमध्ये काँग्रेस उमेदवार अक्षय बामने आपली उमेदवारी मागे घेतली. उमेदवारी मागे घेऊन अक्षय बामने भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे इंदूरमध्ये आता काँग्रेसच आव्हान उरलेलं नाहीय. अक्षय भाजपा आमदार रमेश मेंदोला यांच्यासोबत आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गेले होते.

इंदूर लोकसभा क्षेत्रातून भाजपाने विद्यमान खासदार शंकर लालवानी यांना तिकीट दिलं आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर कैलाश विजयवर्गीय यांनी टि्वट केलं. इंदूरमधील काँग्रेस लोकसभा उमेदवार अक्षय कांती बाम यांचं पीएम मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, सीएम मोहन यादव आणि प्रदेश अध्यक्ष वीडी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजपात स्वागत आहे.

‘भाजपाने निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या’

इंदूरमधून अक्षय बाम यांनी उमेदवारी मागे घेण्यावर काँग्रेस नेते मुकेश नायक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ही पक्षासोबत फसवणूक आहे. भाजपाने निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. खजुराहोप्रमाणे काँग्रेस आता इंदूरमध्ये कुठल्या अन्य उमेदवाराला पाठिंबा देण्याचा विचार करेल”

कधी उमेदवारी अर्ज भरलेला?

अक्षय बामने उमेदवारी मागे घेण्यावर भाजपा नेते नरेंद्र सलूजा म्हणाले की, “मध्य प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांचं गृहनगर इंदूर काँग्रेस मुक्त झालं आहे. मोठ मोठे दावे करणाऱ्या पटवारींनी इंदूरमध्ये काँग्रेसची काय स्थिती आहे ते पहाव. जीतू पटवारी यांनी आता आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे” अक्षय बमने पाच दिवसांपूर्वी 24 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. इंदूर, उज्जैनसह आठ लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.