नागपुरातील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी! पटोले, राऊत, केदार यांना दिल्लीचं बोलावणं
नागपूर विधान परिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेसमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता. या गोंधळाच्या मुद्द्यावर काँग्रेस हायकमांडने प्रमुख नेत्यांना समन्स दिल्याचं कळतंय. हायकमांडकडून बोलावणं आल्यामुळे हे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. या तिन्ही नेत्यांमध्ये एकमत नसल्यामुळे त्याबाबत खुलासा करण्यासाठी दिल्लीत पाचारण करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
नवी दिल्ली : नागपूर विधान परिषद (Nagpur Legislative Council) निवडणुकीतील पराभव काँग्रेसच्या (Congress) चांगलाच जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपमधून आयात केलेल्या उमेदवारीला तिकीट आणि मतदानाच्या पूर्वसंध्येला अपक्ष उमेदवाराला पाठिंबा या गोंधळामुळे नागपूर काँग्रेसमधील मतभेद समोर आल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यामुळे काँग्रेस उमेदवाराला मोठ्या फरकारने पराभवाला सामोरं जावं लागल्याची चर्चा सध्या सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि क्रीडा मंत्री सुनील केदार यांना हायकमांडने बोलावल्याची माहिती मिळतेय.
नागपूर विधान परिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेसमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता. या गोंधळाच्या मुद्द्यावर काँग्रेस हायकमांडने प्रमुख नेत्यांना समन्स दिल्याचं कळतंय. हायकमांडकडून बोलावणं आल्यामुळे हे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. या तिन्ही नेत्यांमध्ये एकमत नसल्यामुळे त्याबाबत खुलासा करण्यासाठी दिल्लीत पाचारण करण्यात आल्याची माहिती मिळतेय. संध्याकाळी 7 वाजता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घरी ही बैठक होणार आहे.
बावनकुळेंचा विजय, महाविकास आघाडीची मतं फुटली
या निवडणुकीत भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय झाला. महत्वाची बाब म्हणजे यावेळी महाविकास आघाडीचीही मत फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत बावनकुळे यांना 362 मतं मिळाली. काँग्रेसनं पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 तर भाजपकडून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक छोटू भोयर यांना फक्त एक मत मिळालं. या निवडणुकीत महाविकास आघाडीची जवळपास 16 मतं फुटल्याचं समजतं.
12 तास आधी उमेदवार बदलण्याची नामुष्की
विधान परिषद मतदानाच्या अवघ्या 12 तास आधी काँग्रेसवर उमेदवार बदलाची नामुष्की ओढावली होती. काँग्रेसकडून छोटू भोयर यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थना दर्शवल्यामुळे अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा देत असल्याचं पत्रक काढलं होतं. मात्र, नेते आणि मंत्र्यांमधील मतभेदामुळे काँग्रेसवर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
पटोले म्हणतात आमचं नुकसान नाही!
“काँग्रेसच्या मतांमध्ये कोणताही फरक पडलेला नाही. आमचा उमेदवार गरीब होता पण भाजपाचा उमेदवार आर्थिकदृष्ट्या बलाढ्य होता. यांच्याकडे 90 मते जास्त असताना सुद्धा सर्व उमेदवार घेऊन पळावे लागले. त्यांचा घोडेबाजार करावा लागला. हाच खऱ्या अर्थाने भाजपाचा नैतिक पराभव आहे. आजच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो पण भाजपाने जे कृत्य केले त्यातून त्यांचा नैतिक पराभव झाला. लोकांमध्ये निवडूण येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यामध्ये लोकांनी भाजपाचा पराभव केला,” असं नाना पटोले निवडणूक निकालानंतर म्हणाले होते.
इतर बातम्या :