Congress : पालिका निवडणुकीसाठी राऊतांची स्वबळाची घोषणा, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Congress : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज एक मोठी घोषणा केली. ठाकरे गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याच त्यांनी सांगितलं. त्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

Congress : पालिका निवडणुकीसाठी राऊतांची स्वबळाची घोषणा, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
Congress Party
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 11:10 AM

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना एक मोठी घोषणा केली. मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची खासदार संजय राऊत यांनी घोषणा केली. उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढवण्याचे संकेत दिल्याच संजय राऊत म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या संजय राऊत यांच्या या घोषणेनंतर काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे.

“विधानसभेला महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात स्थानिक पातळीवर असे निर्णय होत असतात. पॉलिसी डिसीजन म्हणून एकत्र ठरवता येऊ शकतं. पण व्यक्तीगत निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची स्थानिक पातळीवर तयारी केलेली असते. अधिकृत घोषणा केली, त्यांनी ठरवलं तर त्यांचा पक्ष आहे. ते निवडणूक लढवू शकतात. सगळ्या महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची तयारी आहे. महाविकास आघाडीने एकत्र बसून विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं” असं माणिकराव ठाकरे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे काय म्हणाले?

“संजय राऊत, शिवसेना महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने कशी निवडणूक लढवायची हा त्यांचा प्रश्न आहे. पण भिन्न विचारसरणीचे लोक जेव्हा महायुती, मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र येतात, तेव्हा त्यांचा एकत्रितपणा किती क्षणासाठी आहे, हे यातून दिसून येतं” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?

“मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल. एकदा आम्हाला पाहायचंच आहे. नागपूरलाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. आताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता असं आमचं ठरतंय की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल… कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला किंबहुना पक्षाच्या वाढीला बसतो. महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून आपपले पक्ष मजबूत करावेत”, असे संजय राऊत म्हणाले.

Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.