नारायण राणेंना त्यांचाच पक्ष किंमत देत नाही, भाजपचं सरकार आलं नाही म्हणून तडफड : एकनाथ गायकवाड
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे (Eknath Gaikwad slams Narayan Rane).
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. राणे यांनी ठाकरे सरकार कोसळण्याची आणखी एक डेडलाईन जाहीर केली आहे. येत्या 2021 च्या मार्च महिन्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. त्यांच्या याच दाव्यावरुन एकनाथ गायकवाड यांनी टीका केली आहे (Eknath Gaikwad slams Narayan Rane).
“नारायण राणेंना भाजपात कोण विचारतंय? हे पंचांग घेऊन बसले आहेत. दरवेळी नव्या तारखा देण्यात काय तथ्य? त्यांचा पक्ष त्यांना किंमत देत नाही तर इतर काय देणार? सरकार आलं नाही म्हणून तडफड सुरू आहे”, असा घणाघात त्यांनी केला (Eknath Gaikwad slams Narayan Rane).
शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या कुटुंबियांना शहिदांचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी स्लमसेलकडून श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात एकनाथ गायकवाड सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर गायकवाड यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित करताना त्यांनी नारायण राणेंवर सडकून टीका केली.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले?
“येत्या 2021 च्या मार्च महिन्यानंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार सत्तेवर येणार. केंद्रातही भाजप आणि महाराष्ट्रातही भाजप सरकार सत्तेवर येणार. सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आणि खासदार टेंपररी असून ते लवकरच लाँग रजेवर जाणार”, असं नारायण राणे म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून नारायण राणे वारंवार हे सरकार पडणार, अशा प्रकारचं वक्तव्य करत आले आहेत. गेल्या महिन्यात राणे यांनी भाजपकडून ऑपरेशन लोटस राबविलं जात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा ठाकरे सरकार कोसळणार, असं वक्तव्य केलं. याबाबत त्यांनी डेडलाईनदेखील जाहीर केली. 2021 च्या मार्च महिन्यानंतर ठाकरे सरकार कोसळेल, असा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय हे सरकार कोसळल्यानंतर भाजपचं बहुमताचं भक्कम सरकार स्थापन होईल, असं त्यांनी सांगितलं आहे.
संबंधित बातमी : राणेंकडून नवी डेडलाईन, “केंद्रात आणि राज्यात भाजपच येणार, ठाकरे सरकार कोसळणार”