उद्धव ठाकरे यांना दिल्ली भेटीचं निमंत्रण, राहुल गांधी ‘मातोश्री’वर जाणार की नाहीत? मोठी बातमी आली समोर

"महाराष्ट्र आणि देशातील राजकारणातील विरोधकांच्या एकीबाबत चर्चा झाली. सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निरोपाची माहिती वेणुगोपाल यांनी दिली", असं संजय राऊत यांनी सांगितलं. त्यानंतर सोनिया गांधी यांनी दिलेला निरोप नेमका काय होता ते पत्रकार परिषदेच्या शेवटी समोर आलं.

उद्धव ठाकरे यांना दिल्ली भेटीचं निमंत्रण, राहुल गांधी 'मातोश्री'वर जाणार की नाहीत? मोठी बातमी आली समोर
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 9:41 PM

मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल (K C Venugopal) यांनी आज मुंबईत दाखल होत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. के. सी. वेणुगोपाल यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, भाई जगताप हे देखील होते. या भेटीनंतर उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि वेणुगोपाल यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर येणार का? या प्रश्नाचं उत्तर दिलं. विशेष म्हणजे वेणुगोपाल यांनी उद्धव ठाकरे यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीला येण्याचं निमंत्रण दिलं.

“महाराष्ट्र आणि देशातील राजकारणातील विरोधकांच्या एकीबाबत चर्चा झाली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निरोपाची माहिती वेणुगोपाल यांनी दिली”, असं संजय राऊत यांनी सांगितलं. त्यानंतर सोनिया गांधी यांनी दिलेला निरोप नेमका काय होता ते पत्रकार परिषदेच्या शेवटी समोर आलं. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ठाकरेंना दिल्ली भेटीचं निमंत्रण दिलं आहे. ठाकरे दिल्लीत गेल्यानंतर राहुल गांधी मुंबईत त्यांच्या भेटीसाठी येणार असल्याचं स्पष्ट विधान वेणुगोपाल यांनी केलं. “मी उद्धव ठाकरे यांना विनंती करतो की, त्यांनी दिल्लीत यावं. उद्धव ठाकरे आधी दिल्लीत आले की राहुल गांधी मुंबईत येतील”, असं वेणुगोपाल म्हणाले.

“मी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलो. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा निरोप घेऊन मी आलो आहे. आमचा मेसेच हा स्पष्ट आहे, सध्याची राजकीय परिस्थिती, उद्धव ठाकरे कसा लढा देत आहेत, देशाची राजधानी कशाप्रकारे संपवली जात आहे याचे आपण साक्षीदार आहोत. दिवसेंदिवस ईडी, सीबीआय शिवसेना आणि विरोधी पक्षांना टार्गेट करत आहेत. काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आहे. या लढ्यात आम्ही सगळे एकत्र आहोत. आम्ही 19 ते 20 विरोधी पक्ष एकत्र आहोत. प्रत्येक विरोधी पक्ष एकत्र येत आहे”, असं वेणुगोपाल यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हुकूमशाही विरोधात प्रत्येक विरोधी पक्षाला लढायचं आहे. ही बाब सर्वांमध्ये साम्याची आहे. प्रत्येक पक्षाची वेगवेगळी विचारधारा आहे. पण सध्या लोकशाही वाचवण्यासाठी सर्व एकत्र आलो आहोत. आम्ही एकसाथ आहोत. हाच मेसेज आम्हाला द्यायचा आहे”, असं यावेळी वेणुगोपाल म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“आमच्या भेटीचा उल्लेख वेणुगोपाल यांनी स्पष्ट शब्दांत केलं आहे. देशासमोरचा प्रश्न फार मोठा आहे. नुसतं विरोधी पक्षाचं समीकरण हा मुद्दा नाही. तर देशात मी करण चाललं आहे. त्याविरोधात आम्ही एकत्र येत आहोत. प्रत्येक पक्षाची आयडोलॉजी आहे. पण लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. निवडणुका जवळ आल्या आहेत. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा मधल्या काळात बोलले की सर्वच पक्ष संपतील. सत्ता भक्षक हा शब्द त्यांच्यासाठी योग्य ठरतो. शिवसेना देशासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरली आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“वेणुगोपाल यांचे आम्ही आभारी आहोत. आम्ही जेव्हा मैत्री जपतो तेव्हा ती फक्त मैत्री राहत नाही तर एक नातं असतं. भाजपसोबत आम्ही मैत्री जपली. पण त्यांना त्याची जाणीव राहिली नाही. हरकत नाही. आपण देशाच्या लोकशाहीसाठी एकत्र लढू”, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.