Marathi News Politics Congress leader nana patole meet devendra fadnavis for discussion on mlc election
नाना पटोले पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महत्त्वाची बैठक
सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे. आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी प्रत्येक पक्षाचे नेते डावपेच आखण्यात दंग आहेत. कांँग्रेस नेते शरद रणपिसे यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आलीय.
देवेंद्र पडणवीस, नाना पटोले
Follow us on
मुंबई : सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे. आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी प्रत्येक पक्षाचे नेते डावपेच आखण्यात दंग आहेत. कांँग्रेस नेते शरद रणपिसे यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आलीय. हीच निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यापूर्वीदेखील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी पटोले यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती.
रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांची पत्नी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यता आली आहे. काँग्रेसने 15 नोव्हेंबर रोजी याबाबत अधिकृत घोषणा केली होती. काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचं निधन झालं. त्यामुळे रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विरोधी पक्षाशी चर्चा करून प्रज्ञा सातव यांना बिनविरोध निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याच नाना पटोले म्हणाले होते. त्या नंतर आता नाना पटेले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
यापूर्वी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी घेतली होती भेट
यापूर्वीदेखील नाना पटोले यांनी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीवेळी फडणवीस यांची भेट घेतली होती. काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची एक जागा रिक्त झाली होती. या जागेवर काँग्रेसतर्फे रजनी पटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. याच जागेसाठी निवडणुकीत भाजपने दिलेला उमेदवार मागे घेण्याची विनंती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि पटोले यांनी फडणवीसांकडे केली होती. आता पुन्हा एकदा विधानपरिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पटोले यांनी फडणवीस यांची भेट घेतलीय.
भाजप काय भूमिका घेणार ?
दरम्यान, या भेटीमधील चर्चेचे तपशील समोर न आल्यामुळे विधानपरिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का ? हे आताच सांगणे कठीण आहे. मात्र, पटोले यांनी फडवीसांकडे तशी मागणी केल्यामुळे भाजप त्यासंदर्भात काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.