चंद्रकांत खैरे यांचं ‘ते’ विधान झोंबल, काँग्रेस-ठाकरे गटात पहिल्यांदाच जुंपली; नाना पटोले म्हणाले, ज्यांना आपला पक्ष सांभाळता…

फडणवीस यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यामुळे त्यांची ही धडपड सुरू आहे, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यावर पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत खैरे यांचं 'ते' विधान झोंबल, काँग्रेस-ठाकरे गटात पहिल्यांदाच जुंपली; नाना पटोले म्हणाले, ज्यांना आपला पक्ष सांभाळता...
चंद्रकांत खैरे यांचं 'ते' विधान झोंबल, काँग्रेस-ठाकरे गटात पहिल्यांदाच जुंपलीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 05, 2022 | 12:32 PM

बुलढाणा: ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांच्या एका विधानामुळे ठाकरे गट आणि शिवसेनेत पहिल्यांदाच जुंपली आहे. चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे 22 आमदार फुटणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) चांगलेच संतप्त झाले आहेत. ज्यांना स्वत:चा पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी इतरांची काळजी करू नये, असा संतप्त हल्लाबोल नाना पटोले यांनी खैरेंवर केला आहे. तर काँग्रेसच्या काही नेत्यांनी खैरे यांनी आपलं विधान मागे घेण्याची मागणीही केली आहे. पहिल्यांदाच काँग्रेस (congress) आणि ठाकरे गटात जुंपल्याने महाविकास आघाडीत चांगलीच खळबळ उडाली आहे.

नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. जे आपला पक्ष सांभाळू शकले नाहीत. त्यांना दुसऱ्यांच्या पक्षाची काळजी करण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या पक्षात पाहावं, असा हल्ला नाना पटोले यांनी खैरेंवर चढवला आहे.

हे सुद्धा वाचा

शिंगे गटाचे 16 आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील सरकार कोसळण्याची देवेंद्र फडणवीस यांना भीती आहे. त्यामुळे सरकार टिकून ठेवण्यासाठी त्यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार करून ठेवले आहेत.

फडणवीस यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यामुळे त्यांची ही धडपड सुरू आहे, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यावर पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांच्या फडणवीसांनी महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला या विधानाचाही समाचार घेतला. माझ्या मित्राचाच करेक्ट कार्यक्रम झालाय. खरं तर माझा मित्र मुख्यमंत्री असायला पाहिजे होता, परंतु त्यांचे डिमोशन झाले. त्याचे सर्वात जास्त दुःख मला आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी फडणवीस यांना डिवचले.

राज्यामध्ये हुकूमशाहीचे सरकार आहे. लोकशाहीला न मानणारे सरकार आहे. त्यामुळे भारत तोडो सरकारला हे कळणार नाही. भारत जोडो यात्रेचा उलटा परिणाम पाहायला मिळत आहे, असंही ते म्हणाले.

तोडोवाल्यांचा जोडोशी काय संबंध? त्यांच्याबद्दल फारसे बोलणे योग्य नाही. गिरीश महाजन यांनी भारत जोडो यात्रेचा परिणाम उलटा पाहायला मिळत असल्याची टीका केली होती, त्यावर पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.