विखेंना भाजपमध्ये घेण्यास मुख्यमंत्र्यांकडून सबुरीचा सल्ला
मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस पुढील दोन दिवसात दिल्लीत जाणार त्यानंतरच भाजप श्रेष्ठी चर्चा केल्यानंतरच विखे पाटलांच्या प्रवेशबाबत निश्चित निर्णय घेतला जाईल.
मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपप्रवेश लांबणीवर पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवसात दिल्लीत चर्चा करुन, पक्षप्रवेशाबाबत भूमिका घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना कळवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस पुढील दोन दिवसात दिल्लीत जाणार त्यानंतरच भाजप श्रेष्ठी चर्चा केल्यानंतरच विखे पाटलांच्या प्रवेशबाबत निश्चित निर्णय घेतला जाईल. तूर्तास विखे पाटलांना मुख्यमंत्र्यांनी सबुरीचा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, राधाकृष्ण विखे पाटील यांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेस सहमती आहे.
कोण आहेत राधाकृष्ण विखे पाटील?
राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील हे त्यांचे वडील. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर ते कृषीमंत्री झाले होते. 2009 पासून ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. राजीनामा देण्याआधी ते काँग्रेसचे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते होते. अहमदनगरमधील प्रवरा शिक्षण प्रसारक संस्थेचे ते प्रमुख आहेत.
दरम्यान, दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये जाण्यासाठी उत्सुकत असलेल्या काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांना सिल्लोडमधील भाजप पदाधिकऱ्यांकडून विरोध होत आहे. भाजपचे सिल्लोड तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे आणि माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये घेण्यास विरोध दर्शवला आहे.
संबंधित बातम्या :
विखेंकडून आमदारकीचा राजीनामा, आता काँग्रेसला खिंडार पाडून बाहेर पडणार
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांशी स्वत: मुख्यमंत्री बोलणी करणार?
“विखेंसोबत 10 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार”
महाराष्ट्रात काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपच्या गळाला?
“विखेंसह काँग्रेसचे सात आमदार आणि हजारो लोकप्रतिनिधी, पदाधिकारी भाजप प्रवेश करतील”
राधाकृष्ण विखेंच्या गाडीत जयकुमार गोरे, थेट भाजपात जाणार?
काहीही अंधारात नाही, सांगून करणार, राधाकृष्ण विखे राजीनामा देणार
आमदार अब्दुल सत्तार आपल्या पक्षात नको, भाजपमधून तीव्र विरोध सुरु