पवारांच्या मनात द्वेष, राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई: “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी निवडणुकीपूर्वीच माझ्या हयात नसलेल्या वडिलांबाबत (दिवंगत बाळासाहेब विखे पाटील) भाष्य केलं. पवारांचं वक्तव्याने दु:ख झालं. त्यांनी ते वक्तव्य करायला नको होतं”, असं काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “शरद पवारांनी हयात नसलेल्या बाळासाहेब विखे पाटलांबद्दल वक्तव्य […]
मुंबई: “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी निवडणुकीपूर्वीच माझ्या हयात नसलेल्या वडिलांबाबत (दिवंगत बाळासाहेब विखे पाटील) भाष्य केलं. पवारांचं वक्तव्याने दु:ख झालं. त्यांनी ते वक्तव्य करायला नको होतं”, असं काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“शरद पवारांनी हयात नसलेल्या बाळासाहेब विखे पाटलांबद्दल वक्तव्य करणं चुकीचं आहे. पवारांनी 1991 च्या निवडणुकीचा दाखला देत, बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव केल्याचं सांगितलं. सध्याच्या निवडणुकीपूर्वीच त्यांचं हे वक्तव्य दु:ख देणारं आहे. शरद पवारांच्या मनात द्वेष आहे. माझ्या वडिलांबाबत बोलणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा प्रचार नगरमध्ये का करु”, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारला.
ज्याला त्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मी मान्य करेन. माझ्या काँग्रेस पक्षाची जी भूमिका असेल ते मी मान्य करेन. कुठे प्रचार करायचा ते समिती ठरवेल, असं राधाकृष्ण विखे म्हणाले.
विखेंनी जे मागितलं ते पक्षानं दिलं, मुलाला त्यांनी समजवायला हवं होतं : थोरात
शरद पवारांच्या बाल हट्ट या विधानावर मात्र विखे यांनी बगल दिली. या याबद्दल त्यांनाच विचारले पाहिजे, असं ते म्हणाले. तसेच, आघाडी संदर्भातील परिस्थितीचा निकालावर परिणाम होणार नाही, असं ते म्हणाले.
बाळासाहेब विखेंबद्दल पवार काय म्हणाले होते?
शरद पवार यांनी 11 मार्च रोजी माढा लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबतची माहिती दिली होती. त्यावेळी शरद पवारांना सुजय विखेंबद्दल विचारण्यात आलं होतं. सुजय विखेंनी राष्ट्रवादीकडून तिकीट मागितलं होतं. राष्ट्रवादीने नगरची जागा जिंकली नसताना सुजय विखेंना तिकीट का देऊ शकत नाही असा प्रश्न त्यावेळी शरद पवारांना विचारला होता. त्यावेळी शरद पवारांनी बाळासाहेब विखेंच्या पराभवाचं उदाहरण दिलं होतं.
बाळासाहेब विखे विरुद्ध शरद पवार यांच्यातला वाद नेमका काय आहे?
नगरची जागा राष्ट्रवादीकडेच असेल. आमचे तिथं प्राबल्य आहे. तिथं आम्ही बाळासाहेब विखे यांचा पराभव केला होता, हे प्रकरण न्यायालयात गेले होते. अहमदनगर दक्षिण राष्ट्रवादीकडंच राहिल, असं त्यावेळी पवार म्हणाले होते.
विखे पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
- सुजयच्या विरोधात प्रचार करणार नाही, मी नगरला प्रचाराला जाणार नाही, माझ्याबद्दल जर राष्ट्रवादीला संशय असेल तर मी प्रचार कसा करु? – राधाकृष्ण विखे पाटील
- काँग्रेसशी माझी बांधिलकी, ते सांगतील ते मी करेन, तोच निर्णय मान्य – राधाकृष्ण विखे पाटील
- पवारांच्या मनात विखेंबद्दल अजूनही द्वेष आहे, प्रचाराला जाऊन संशय नको, त्यामुळे नगरमध्ये मी प्रचार करणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील
- पवारांच्या मनात विखेंबद्दल अजूनही प्रचंड द्वेष – राधाकृष्ण विखे पाटील
- नगरमध्ये शरद पवारांनी आधीच शंका उपस्थित केली, त्यामुळे प्रचाराला जाणार नाही, नगरमध्ये मी प्रचार करणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील
- बाळासाहेब थोरांताना स्पष्टीकरण द्यायला मी बांधिल नाही, ते काही हायकमांड नाहीत, त्यावर नंतर बोलेन – राधाकृष्ण विखे पाटील
- नगरमध्ये राष्ट्रवादीचा मी प्रचार करणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील
- शरद पवारांनी बाळासाहेब विखेंबद्दल जे विधान केलं, त्याने निश्चितच मला दु:ख झालं – राधाकृष्ण विखे पाटील
- लोकसभा निवडणुकीबाबत माझ्या मुलामुळे सर्व संघर्ष उभा राहिला हे म्हणणं चुकीचे आहे, काँग्रेस पक्ष म्हणून काही जागांची मागणी आम्ही केली. त्यात अहमदनगरची जागा होती – राधाकृष्ण विखे पाटील
- डॉ. सुजय विखेंनी जो निर्णय घेतला, तो त्याचा स्वत:चा निर्णय, विरोधी पक्षनेता म्हणून आघाडीला गालबोट लावण्याचा काम मी कधीही केलं नाही – राधाकृष्ण विखे पाटील
- शरद पवारांनी हयात नसलेल्या बाळासाहेब विखे पाटलांबद्दल वक्तव्य करणं चुकीचं – राधाकृष्ण विखे पाटील
- मुलासाठी संघर्ष झालाय असं म्हणणं चूक : राधकृष्ण विखे पाटील
- माध्यमांमधून जे काही सांगितलं जात आहे, मी ठरवलं होतं की सर्व प्रतिक्रिया आल्यानंतर आपली भूमिका मांडेन – राधाकृष्ण विखे पाटील