महायुतीत गुंडांची भरती जोरात…संजय राऊत यांच्यानंतर आता काँग्रेस आक्रमक

| Updated on: Feb 06, 2024 | 11:12 AM

Congress and Mahayuti : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पुणे शहरातील गुंड निलेश घायवळ याचा फोटो आला. या प्रकरणात संजय राऊत आक्रमक झाले. आता काँग्रेसनेही टीका केली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर टीकेची झोड उठवली आहे.

महायुतीत गुंडांची भरती जोरात...संजय राऊत यांच्यानंतर आता काँग्रेस आक्रमक
vijay wadettiwar
Follow us on

मुंबई, दि. 6 फेब्रुवारी 2024 | आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर राज्यातील राजकारणातील गुन्हेगारीवर चर्चा होऊ लागली आहे. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने त्यांना शुभेच्छा दिल्या. त्या फोटोवरील चर्चा सुरु असताना अजित पवार यांची पुण्यातील गुन्हेगार असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढी याने भेट घेतली. सोमवारी या दोन घटना उघड झाल्यानंतर मंगळवारी संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट केला. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पुणे शहरातील गुंड निलेश घायवळ याचा फोटो आला. त्यानंतर संजय राऊत यांनी आम्ही रोज असे एक, एक फोटो देणार असल्याचे म्हटले. आता संजय राऊत यांच्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर टीकेची झोड उठवली आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी दोन दिवसांतील घडामोडींचे फोटो ट्विट केले आहे. सोबत कॅप्शनमध्ये महायुतीवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, निवडणुकांआधी महायुतीत गुंडांची भरती जोरात! निवडणुकीपूर्वी सत्तेतील तीनही पक्षात स्वतःची गँग मजबूत करण्यासाठी जबरदस्त स्पर्धा करत आहेत.

  • मुख्यमंत्री पुत्राची वर्षा बंगल्यावर हेमंत दाभेकरशी भेट.
  • मुख्यमंत्र्यांची निलेश घायवाळ सोबत भेट.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमधे गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या आसिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढीशी भेट
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाची गजा मारणेशी घरी जाऊन भेट.

गुंडांचे आदरतिथ्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून जनतेने कायदा व सुव्यवस्थेची अपेक्षा कशी करावी? अशी जहरी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

राजकारणातील गुन्हेगारीवर चर्चा

उल्हानगर पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड याने शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड याच्यावर गोळ्या चालवल्या. या प्रकरणानंतर राजकारणीतील गुन्हेगारीवर चर्चा सुरु झाली. ही चर्चा सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचे गुंडांसोबतचे फोटो व्हायरल झाले. त्यामुळे महायुतीवर टीका करण्याची संधी विरोधकांना मिळाली.

ही ही वाचा…

मुख्यमंत्र्यांसोबत पुण्यातील गुंडाचा फोटो, महाराष्ट्रात गुंडा राज…ट्विट करत संजय राऊत यांचा हल्लाबोल