‘बलात्कार हे राजकीय हत्यार, असे सावरकरांचे विचार’, शिवानी वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरुन राज्यात पुन्हा नव्या वादाची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सावरकरांच्या मुद्द्यावरुन टीका न करण्याचा सल्ला दिला असताना एक वेगळा प्रकार बघायला मिळाला आहे. महाराष्ट्र काँग्रेस सावरकरांच्या मुद्द्यावरुन मागे हटायला तयार नाहीय.

‘बलात्कार हे राजकीय हत्यार, असे सावरकरांचे विचार’, शिवानी वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरुन राज्यात पुन्हा नव्या वादाची शक्यता
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 7:04 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सावरकरांच्या मुद्द्यावरुन मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करु नये, असा सल्ला राहुल गांधी यांना दिल्याची माहिती समोर आलेली. तसेच राहुल गांधी यांनीही तो सल्ला मानल्याची चर्चा आहे. असं असताना महाराष्ट्र काँग्रेस सावरकरांच्या मुद्द्यावरुन मागे हटायला तयार नाही. काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवर यांच्या मुलगी शिवानी वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणाचा एक व्हिडीओ ट्विट केलाय. या व्हिडीओत शिवानी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर खोचक शब्दांत टीका करताना दिसत आहेत.

शिवानी वडेट्टीवार यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीची एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून सावरकरांचं समर्थन देणारे सावरकर हिंदूंचे प्रेरणास्थान कसे? असा प्रश्न त्यांनी विचारलाय. शिवानी वडेट्टीवार यांचा हा व्हिडीओ भाजप नेत्याकडून रिट्वीट करण्यात आलाय. उद्धव ठाकरे यावर बोलणार की बोटचेपी भूमिका घेणार? असा प्रश्न भाजपने उपस्थित केलाय.

शिवानी वडेट्टीवार नेमकं काय म्हणाल्या?

“हे लोकं फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाहीत. कुठला मोर्चा काढतात? तर सावरकर मोर्चा काढतात. सावरकर मोर्चा काढून काय करतात? सावरकर मला तर… माझ्यासोबत सगळ्या महिला भगिनी इथे उपस्थित आहेत. सगळ्यांना भीती वाटत असेल कारण की सावरकरांचे विचार होते, काय विचार होते. बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. हे तुम्ही आपल्या राजकीय विरोधकांविरोधात वापरलं पाहिजे. या विचारांचे ते समर्थन करतात. मग माझ्या सारख्या महिला भगिनींना कसं सेफ वाटेल? आणि अशा लोकांचा प्रचार करत हे लोकं रॅली काढतात”, अशी टीका शिवानी वडेट्टीवार यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, शिवानी वडेट्टीवार यांच्या व्हिडीओवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. “नेतेच जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास समजू शकले नाहीत तर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा ठेवणार? काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नागपुरात गंगा-जमुना वस्तीमध्ये जाऊन देशाच्या संस्कृतीची नाचक्की होईल, अशी वर्तवणूक केली. सावकरांविषयी ते असे प्रश्न उपस्थित करता हे पाहून रागही येतो आणि दयाही येते. मला वाटतं हे काँग्रेसची विनाशकाली विपरीत बुद्धी आहे. ही राजकीय आत्महत्या आहे. आम्हाला जे स्वातंत्र्य हवं होतं ते संस्कारीक स्वातंत्र्य हवं होतं. सोयराचारी स्वातंत्र्य हे काँग्रेस जन्माला घालतंय”, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.