AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा वादाचा ठरणार? काँग्रेस नेते काळे झेंडे दाखवणार

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींचा हा दौरा भाजपसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातोय. मात्र, पंतप्रधान मोदींचा हा दौरा वादाचा ठरण्याची शक्यता आहे. कारण पुण्यातील काँग्रेस नेत्यांनी मोदींच्या दौऱ्यावेळी निदर्शनं करण्याचा आणि मोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा वादाचा ठरणार? काँग्रेस नेते काळे झेंडे दाखवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 8:02 PM

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 6 मार्चला पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुणे मेट्रोचं (Pune Metro) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींचा हा दौरा भाजपसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातोय. मात्र, पंतप्रधान मोदींचा हा दौरा वादाचा ठरण्याची शक्यता आहे. कारण पुण्यातील काँग्रेस (Congress) नेत्यांनी मोदींच्या दौऱ्यावेळी निदर्शनं करण्याचा आणि मोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना महाराष्ट्र काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसनं मजुरांना त्यांच्या राज्यात परत जाण्यास सांगितल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी संसदेत केला होता. त्यानंतर काँग्रेस नेते अधिक आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी माफी मागावी, अशी आक्रमक मागणी काँग्रेसकडून करण्यात येतेय.

‘मोदींनी माफी मागावी आणि मगच यावं’

आता पंतप्रधान मेट्रोच्या उद्घाटनासाठी 6 मार्चला पुणे दौऱ्यावर येत आहेत. अशावेळी मोदींनी संसदेत केलेल्या वक्तव्याप्रकरणी महाराष्ट्राची माफी मागावी आणि मगच महाराष्ट्रात यावं. माफी मागितली नाही तर मोदींच्या दौऱ्यात निरर्शनं करणार आणि काळे झेंडे दाखवणार, असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी दिलाय.

कसा असेल पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा?

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी महामेट्रोच्या उदघाटनासाठी पुण्यात येणार आहेत . 6 मार्च रोजी सकाळी 10:30मिनीटांनी लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे.

>> त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा पारपडणार आहे.

>> पंतप्रधान मेट्रोच्या उद्घाटनासाठी गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्टेशनवर जातील. तेथून मेट्रोने ते आनंदनगर स्टेशन येथे जाणार आहेत.

>> मेट्रोचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर मोदींची जंगी सभा होणार, आगामी महापालिका निवडणुकीसाठी ही सभा महत्त्वपूर्ण ठरणार असून , भाजप कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळणार आहे.

>> एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावरील सभा आटोपल्यानंतर हेलिकॉप्टरने ते लवळे येथील कार्यक्रमाला जाणार आहेत.

>> लवळे येथील कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी 3 च्या सुमारास लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना होणार आहेत.

इतर बातम्या :

‘मिर्चीची सवय लागली असेल तर सामान्यांच्या कराच्या पैशाची चहा गोड कशी लागणार?’, अतुल लोंढेंचा फडणवीसांचा टोला

एक महिला 15 वर्षे पंतप्रधान होती, पण महिलांचे दुःख दूर केले नाही, औरंगाबादेत रावसाहेब दानवेंची इंदिरा गांधींवर टीका

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.