जम्मू-काश्मीरमधून ‘कलम 370’ हटवणार नाही, काँग्रेसची ग्वाही
नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी ‘जनआवाज’ नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात काँग्रेसने देशातील विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली आहे, तसेच सत्तेत आल्यास विविध समस्यांवर काँग्रेस पक्ष काय करेल, याबाबत विस्तृत सांगण्यात आले आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यातून जम्मू-काश्मीरबाबत भूमिका मांडत, तेथील विकासासंदर्भात मांडणी केली आहे. “जम्मू-काश्मीर राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे, असे काँग्रेस मानते. जम्मू-काश्मीरचा […]
नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी ‘जनआवाज’ नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात काँग्रेसने देशातील विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली आहे, तसेच सत्तेत आल्यास विविध समस्यांवर काँग्रेस पक्ष काय करेल, याबाबत विस्तृत सांगण्यात आले आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यातून जम्मू-काश्मीरबाबत भूमिका मांडत, तेथील विकासासंदर्भात मांडणी केली आहे.
“जम्मू-काश्मीर राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे, असे काँग्रेस मानते. जम्मू-काश्मीरचा इतिहास आणि तेथील परिस्थिती यांचा काँग्रेस आदर करते. कलम 370 मुळे जम्मू-काश्मीरने भारतात येण्यास स्वीकारलं, या घटनात्मक स्थितीला बदलण्याची आम्ही परवानगी देणार नाही किंवा तसा कोणताही प्रयत्न करणार नाही.” अशी ग्वाही काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून देण्यात आली आहे.
काँग्रेसचा जाहीरनामा, राहुल गांधी यांच्या 5 मोठ्या घोषणा
याचसोबत काँग्रेसने जम्मू-काश्मीरसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. “जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या आशा-अपेक्षांना समजण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी चर्चा हा एकमेव मार्ग आहे. आम्ही हाच मार्ग अवलंबू”, असेही आश्वासन काँग्रेसने दिले आहे.
सीमेवरुन होणार घुसखोरी पूर्णपणे संपवण्याच्या आश्वासनासह काँग्रेसने जाहीरनाम्यात म्हटलंय की, “घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर अधिक सैनिक तैनात करणे, काश्मीर कोऱ्यात सैनिक आणि सीआरपीएफच्या हजेरी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांकडे अधिक जबाबदारी सोपवू.”
कुठल्याही अटीविना काँग्रेस जम्मू-काश्मीरमधील जनतेशी संवाद साधेल, चर्चा करेल. यासाठी नागरिकांमधून तीन जणांची नियुक्ती करु, असे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका तातडीने घेतल्या जातील, असेही काँग्रेसने म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमधील जनतेला देशातील इतर भागात त्रास सहन करावा लागतो, गेल्या काही दिवसांतील घटनांमध्ये काँग्रेसला चिंता वाटते. त्यामुळे काश्मिरी नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भातही काँग्रेस योग्य ती पावलं उचलेल, असेही आश्वासन काँग्रेसने जाहीरनाम्यातून दिले आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नेमकं काय म्हटलंय, पाहा जसेच्या तसे :