काँग्रेसचे तब्बल 11 आमदार उपोषणाच्या तयारीत, ठाकरे सरकारवर जाहीर नाराजी

काँग्रेसच्या आमदारांना जाणूनबूजून निधी देण्यास टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरट्याल यांनी केला आहे (Congress MLA are unhappy on fund distribution).

काँग्रेसचे तब्बल 11 आमदार उपोषणाच्या तयारीत, ठाकरे सरकारवर जाहीर नाराजी
Follow us
| Updated on: Aug 23, 2020 | 8:26 PM

जालना : महाविकासआघाडी सरकारमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्याचं नगर विकास खातं निधी वाटप करताना भेदभाव करत आहे. काँग्रेसच्या आमदारांना जाणूनबूजून निधी देण्यास टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरट्याल यांनी केला आहे (Congress MLA are unhappy on fund distribution). यावेळी त्यांनी नगर विकास खातं विरोधकांना निधी देत असल्याचाही आरोप केला. तसेच आपण याविरोधात वेळप्रसंगी उपोषणाचाही मार्ग निवडणार असल्याचा इशारा गोरट्याल यांनी दिला.

विशेष म्हणजे नगरविकास खात्याच्या निधी वाटपावरुन काँग्रेसचे 11 आमदार नाराज असल्याचं काँग्रेस आमदार कैलास गोरट्याल यांनी सांगितलंय. “नाराज आमदारांचे नाव सांगणार नाही. मात्र, वेळ आल्यावर आम्ही लोकशाही पद्धतीने विरोध करु. तेव्हा हे आमदार कोण आहेत हे सर्वांनाच कळेल. आम्ही आगामी अधिवेशनातही आमच्या पद्धतीने याला विरोध करु. आमची उपोषणाला बसायचीही तयारी आहे,” असं कैलास गोरट्याल म्हणाले.

कैलास गोरट्याल म्हणाले, “नगर विकास खात्याला वारंवार निधी मागूनही निधी दिला जात नाही. दिलेला निधी विड्रॉल करुन दुसऱ्या नगरपालिकेला वाटून देण्यात आल्याचा प्रकारही घडला आहे. मी आमदार असून मला 1 रुपयाही निधी दिला नाही. मात्र, आम्ही ज्यांना निवडणुकीत पाडलं त्या आमच्या विरोधकांना निधी दिला जात आहे. नगर विकास खात्याने जालना नगरपालिकेला निधी न देता नगर पालिकेचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.”

“जिल्हा प्रमुखाच्या सांगण्यावरुन 2 कोटी रुपये निधी दिला जातोय, नगरससेवकाच्या बोलण्यावरुन 1 कोटी रुपये देण्यात आले. काँग्रेसच्या आमदारांला किंमत द्यायची नाही म्हणून हा निधी वाटप केला जात आहे. आम्ही याचा निषेध करतो. येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही लोकशाही पद्धतीने जो विरोध करायला हवा तो करणार आहोत. काँग्रेसच्या बहुतांश आमदारांसोबत नगर विकास खात्याने असंच केलं आहे. आम्ही 11 आमदार सध्या एकमेकांच्या संपर्कात आहोत. सर्वजण यावर तीव्र नाराज आहेत,” असंही गोरट्याल यांनी म्हटलं.

संबंधित व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

महाविकास आघाडीत काँग्रेसच्या नाराजीची चर्चा, दिल्लीला जाऊन सोनिया गांधींकडे खदखद व्यक्त करणार

थोडेसे मतभेद असतात, पण आम्ही पूर्ण ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी उभे : जितेंद्र आव्हाड

महाविकास आघाडीत पुन्हा कुरबुरी, आता राष्ट्रवादीची नाराजी

Congress MLA are unhappy on fund distribution

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.