‘इनसे ज्यादा साप…’ नवाब मलिक यांच्यावरून कॉंग्रेस आमदाराचा अजितदादांना टोला

नवाब मलिक यांची अवस्था आता 'जिंदगी भर मैं ये भूल करता रहा, धूल आईने पर थी और मैं मुंह पोछता रहा' अशी झाली आहे. नवाब मलिक अग्नीवीर होणार आहे. अशी अवस्था करून घेण्यापेक्षा, अपमान करून घेण्यापेक्षा त्यांनी राजकिय संन्यास घ्यावा.

'इनसे ज्यादा साप...' नवाब मलिक यांच्यावरून कॉंग्रेस आमदाराचा अजितदादांना टोला
DCM AJIT PAWAR VS MLA KAILAS GORANTYALImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 8:27 PM

राज्यसरकारने यापुढे मुलांच्या नावापुढे आईचे नाव लावण्याचा निर्णय घेतला. हा चांगला निर्णय आहे. राज्यसरकारमधील काही मंत्री त्यांच्या नावापुढे आईचे नाव लावत आहेत. पण, आमदार यांच्या नावापुढेही आईचे नाव लावा अशी मागणी कॉंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली. यानतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केवळ मंत्रीच नाही तर आमदारांनीही आईचं नाव लावायला हवी असे सांगितले. आमदार कैलास गोरंट्याल यांनी यावेळी नवाब मलिक, अजित पवार आणि भाजपवर टीका केली. अजित पवार भाजपसोबत गेले त्याचा लोकसभेत फटका बसला. पण आगामी विधानसभा निवडणुकीत यापेक्षाही जास्त वाईट हाल होतील. शिंदे गटाचे आमदार नाराज आहेत. विधिमंडळात ते काही बोलत नाही. काही जणांनी कोट शिवले पण त्यांना मंत्री केले नाही. पुढे बघा काय होतंय ते असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील. या निवडणुकीत सर्वात जास्त धोका भाजपला आहे. त्यामुळे भाजप त्यांचा उमेदवार कमी करणार. पाच तारखेनंतर यावर सर्विस्तर बोलू. आम्ही त्याचे कॅल्क्युलेशन केले आहे. आम्ही कॅलकुलेटेड पक्ष आहोत. परंतु, भाजपला ओवर कांफिडेंस आहे. जर निवडणुक झाली तर भाजपचा एक ऊमेदवार हरणार असा दावा आमदार गोरंट्याल यांनी केला.

राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार यांची साथ दिली आहे. मात्र, त्यांना कळाले पाहिजे होते की ज्या भाजपने त्यांचा अपमान केला. त्यांना पाठिंबा दिला नाही त्यांच्यासोबत कसे जायचे? मागे प्रफुल्ल पटले यांच्यावरही असाचा आरोप करण्यात आला होत. पण, त्यांना मदत करून राज्यसभेवर पाठविले. नवाब मलिक यांची अवस्था आता ‘जिंदगी भर मैं ये भूल करता रहा, धूल आईने पर थी और मैं मुंह पोछता रहा’ अशी झाली आहे. नवाब मलिक अग्नीवीर होणार आहे. अशी अवस्था करून घेण्यापेक्षा, अपमान करून घेण्यापेक्षा त्यांनी राजकिय संन्यास घ्यावा अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.

इथे सगळेच मतलब के यार हैं. सब के दिल काले हैं, मौका मिलते ही यहां सब डसने वाले हैं, किसमे कितना जहर हैं , हम ही को पता हैं, इनसे ज्यादा साप हमने पाले हैं, असा टोलाही त्यांनी लगावला. विद्यार्थी यांना जेवणाची पाकिटे देण्यात येतात. त्या जेवणाच्या पॅकेटमध्ये साप सापडत आहेत. घोणस, साप पकडायला हवेत. लोकांचा, जनावरांचा साप चावल्याने मृत्यू होत आहे. सरकारने सर्पमित्रांचाही इन्शुरन्स काढावा आणि त्यांना दिलासा द्यावा. यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष यांनी दालनात बैठक घेण्याचे मान्य केले आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

Non Stop LIVE Update
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका.
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप.
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला.
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?.
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक.