Congress Protest | मराठवाड्यातही काँग्रेसचा उद्रेक! औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, हिंगोलीत भाजपविरोधात आक्रमक आंदोलन

औरंगाबाद, नांदेड, परभणी जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून या चौकशीचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस नेत्यांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात (BJP Government) जोरदार घोषणाबाजी केली.

Congress Protest | मराठवाड्यातही काँग्रेसचा उद्रेक! औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, हिंगोलीत भाजपविरोधात आक्रमक आंदोलन
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 7:04 PM

औरंगाबादः काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ED मार्फत चौकशी केली जात आहे. याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रभर काँग्रेस (Maharashtra Congress) कार्यकर्त्यांकडून निदर्शनं केली जात आहे. मराठवाड्यातही याचे पडसाद उमटले. औरंगाबाद, नांदेड, परभणी जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून या चौकशीचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस नेत्यांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात (BJP Government) जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकार दडपशाही करत असून काँग्रेस नेत्यांवर दबाव आणण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस नेत्यांनी केला. औरंगाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही निदर्शनं करण्यात आली. औरंगाबाद, परभणी, हिंगोलीत काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.

औरंगाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं

औरंगाबादमध्ये काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करणारे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पोलीसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला गेला. काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं.

नांदेडमध्येही काँग्रेस आक्रमक

Nanded Congress protest

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडी मार्फ़त चौकशी लावल्याच्या निषेधार्थ आज नांदेड मध्ये काँग्रेसने निदर्शने केली . शहरातील महात्मा फुले चौकात हे आंदोलन करण्यात आले . केंद्र सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकार दडपशाही करत असून , काँग्रेस नेत्यांवर दबाव आणण्यासाठी केंद्र सरकारना तपास यंत्रणाचा गैरवापर करत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस नेत्यांनी केला . या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

परभणीत शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन

Parbhani Protest

राहुल गांधी यांच्यावर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईच्या विरोधात परभणी येथील कार्यकर्त्यांनीही आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोठ्यासंख्येने काँग्रेस कार्यकर्ते जमले होते. मोदी सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

बीडमध्ये काँग्रेसचा निषेध मोर्चा

beed protest

बीडमध्येदेखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात सुरु असलेल्या ईडी चौकशीचा निषेध केला. केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बीडमधील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली.

हिंगोलीत पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत  झटापट

हिंगोलीत काँग्रेसच्या आंदोलनात पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घएतलं. या आंदोलना आमदार प्रज्ञा सातव यादेखील होत्या. त्यांनाही आक्रमक झालेल्या समूहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.