नागपुरचे ‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत, राहुल गांधींचा आरएसएसवर हल्ला

निकरवाले तमिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरएसएसवर निशाणा साधला.

नागपुरचे 'निकरवाले' तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत, राहुल गांधींचा आरएसएसवर हल्ला
rahul gandhi
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 8:51 AM

चेन्नई :  नागपुरचे ‘निकरवाले तमिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही’, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरएसएसवर निशाणा साधला. ‘निकरवाले नाही तर तमिळनाडूचं भविष्य इथले युवा ठरवतील आणि त्यांच्या मदतीला आता मी आलो आहे’, असं राहुल गांधी म्हणाले. (Congress Rahul Gandhi Slam RSS In tamilnadu Nikarwale never decide Future of State)

तमिळनाडूमध्ये यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणूक आहे. याच पार्श्वभूमीवर इथलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. राहुल गांधी तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मेळावे घेत भाजप आणि आरएसएसवर तुफान हल्लाबोल केलाय. ‘तमिळनाडूत असं सरकार हवं की जे सरकार लोकांच्या समस्यांचं निकारण करेल ना की स्वत:ची मन की बात जनतेवर थोपवेल’, असा निशाणा राहुल गांधी यांनी साधला.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाने ज्या प्रकारे भारताचं अध:पतन होतंय, हे आता आपल्याला थांबवायला हवं. मोदींना भारताना पायाच नष्ट करायचाय. आपण सगळे मिळून मोदींच्या राजकारणाविरोधात लढू’, अशी साद राहुल गांधींनी यावेळी जनतेला घातली.

‘मन की बात’ सांगायला आलो नाही ऐकायला आलोय…

“मी आपल्याशी माझी ‘मन की बात’ सांगायला आलो नाही. मी आलोय ते तुमचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढायचा असेल तर काय उपाययोजना कराव्या लागतील हे समजून घेण्यासाठी… मी इथल्या लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आलोय. ना की माझ्या मनातली ‘मन की बात सांगण्यासाठी…’, असं म्हणत त्यांनी मोदींच्या ‘मन की बात’वर सडकून टीका केली.

राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाचं समर्थन करत या विषयावरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी समजून घेण्याऐवजी सरकार त्यांना दहशतवादी ठरवून मोकळं होत आहे. या प्रवृत्तीविरोधात आपल्याला लढायचं आहे’, असं राहुल गांधी म्हणाले.

यंदाच्या वर्षीच तामिळनाडू विधानसभेची निवडणूक

तामिळनाडू विधानसभेची निवडणूक याच वर्षी आहे. 2016 साली पाठीमागची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. आता 2021 म्हणजे याच वर्षी इथे निवडणूक पार पडणार आहे. राहुल गांधी तीन दिवसांच्या तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. 23 जानेवारीला त्यांचं तामिळनाडूत आगमन झालंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूत राजकीय वातावरण तापलंय. यामुळे आतापासूनच नेतेमंडळींनी प्रचाराला सुरुवात केलीय.

(Congress Rahul Gandhi Slam RSS In tamilnadu Nikarwale never decide Future of State)

हे ही वाचा :

दिल्लीतच देशाची राजधानी का?, कोलकातासहीत देशातील चार ठिकाणी राजधानी बनवा: ममता बॅनर्जी

काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची; परस्परांवर पातळी सोडून टीका

ज्यांच्याबरोबर लढायचे त्यांचेच लोक फोडून फौज तयार करायची, सामनातून भाजपवर टीका

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.