विरोधी पक्षाला 15-20 वर्षांनी आशीर्वाद मिळावा, सतेज पाटलांची जहरी टीका
काही गोष्टी सूड बुद्धिने चालल्या आहेत. तपास यंत्रणांचे संस्थात्मक अधिकार टिकायला पाहिजेत. राजकीय हेतूने प्रेरित होऊन काही गोष्टी घडत आहेत हे दुर्देवी असल्याचं सतेज पाटील म्हणाले आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील काँग्रेसचे (congress) नेते, पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या घटनांवरून विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी ईडी कारवायांबद्दलही विरोधी पक्षावर टीकी केली आहे. काही गोष्टी सूड बुद्धिने चालल्या आहेत. तपास यंत्रणांचे संस्थात्मक अधिकार टिकायला पाहिजेत. राजकीय हेतूने प्रेरित होऊन काही गोष्टी घडत आहेत हे दुर्देवी असल्याचं सतेज पाटील म्हणाले आहे. कोल्हापूरमध्ये टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. (congress satej patil criticized on bjp government in kolhapur)
शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. यावर राजकीय हेतूने प्रेरित होऊन काही गोष्टी घडत आहेत हे दुर्देवी असल्याची टीका सतेज पाटीलांनी केली आहे. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते पुन्हा येईन, पुन्हा येईन असं म्हणत होते. पण महाविकास आघाडी भक्कम आहे. 15-20 वर्षांनी त्यांना आशीर्वाद मिळावा अशीही टीका सतेज पाटलांनी केली आहे.
दरम्यान, राज्यात सध्या आगामी ग्रामपंचायत निवडणूक आणि महापालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं. अशात कोल्हापूर महापालिकेची निवडणूक (Kolhapur Municipal election) महाविकास आघाडीतील (Maha vikas aaghadi) सर्व पक्ष वेगळे लढणार असल्याची मोठी घोषणा सतेज पाटलांकडून करण्यात आली आहे. मात्र, निवडणुकीनंतर एकत्र येणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी गर्दी होत आहे. आज सकाळीच त्यांच्या बावडा येथील निवासस्थानी अनेकांनी भेट घेऊन इच्छुक असल्याचे सांगितले आहे. यावेळी सतेज पाटील यांनी आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष वेगळे लढणार आहोत, मात्र निवडणुकीनंतर एकत्र येणार असल्याचे जाहीर केले. (congress satej patil criticized on bjp government in kolhapur)
संबंधित बातम्या
कोल्हापूर महापालिका निवडणूक चंद्रकांत पाटलांचं भवितव्य ठरवणार?
औरंगाबाद, कोल्हापूर ते कल्याण-डोंबिवली, फेब्रुवारीत 5 महापालिकांच्या निवडणुकीचा धुरळा?
(congress satej patil criticized on bjp government in kolhapur)