प्रक्रिया पूर्ण न करताच निवडणुकीमुळे पंतप्रधानांकडून उद्घघाटन, नाना पटोले यांनी रोखठोक सांगितले
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यासाठी जी प्रक्रिया असते ती पाळली गेली नाही. सांस्कृतिक संचालनायलाने प्रामाणिकरण केले नव्हते. हे प्राणाणिकरण झाल्याशिवाय पंतप्रधानांनी जायला नको होते.
राजकोट येथील किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळ्याप्रकरणी महाविकास आघाडीने महायुती सरकारवर जोरदार हल्ला केला. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली. निवडणुकीत लाभ मिळण्यासाठी कोणती प्रक्रिया पूर्ण न करता घाईघाईत पुतळा अनावरण कार्यक्रम झाल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
निवडणुकीत यश मिळवण्यासाठी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यासाठी जी प्रक्रिया असते ती पाळली गेली नाही. सांस्कृतिक संचालनायलाने प्रामाणिकरण केले नव्हते. हे प्राणाणिकरण झाल्याशिवाय पंतप्रधानांनी जायला नको होते. परंतु त्यांनी निवडणुकीत केवळ आम्ही शिवप्रेमी आहोत, हे दाखवण्यासाठी गेले होते. हे लोक शिवद्रोही आहे. राज्यपालांनी शिवाजी महाराजांचा जिरेटोप मोदींच्या डोक्यावर ठेवला होता. हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले.
रश्मी शुक्ला भाजपचा अजेंड राबवताय
मुख्यमंत्री म्हणतात या पेक्षा मोठा पुतळा बनवणार आहे. पण तुम्ही जे पाप केले ते का लपवत आहात. तुम्ही लाचखोर आहात. कमिशन खोर आहात. या सरकारला कधी अक्कल येईल. राज्यात आमची मुले सुरक्षित नाही. आता सात वाजल्यानंतर मुलीबाहेर निघणार नाही असा जीआर काढत आहेत. काय चालले या महाराष्ट्रात. आपल्या राज्यात मुली सुरक्षित नाही. हे सर्व सरकारच्या चुकीने होत आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना कोणत्या आधारावर त्या पदावर बसवले. त्या त्या ठिकाणी बसून संघांचा अजेंडा राबवत आहेत. सरकारने पोलीस दलात जे लोक बसवले आहेत, त्याचे हे पाप आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांच्या काळात लोकांना एक गोष्ट भावली. त्यांच्या काळात एका महिलेवर अत्याचार झाला. ही तक्रार महाराजांकडे आली. त्यानंतर त्यांनी त्याचे दोन्ही हात कलम केलं. अशी प्रकारची नीती त्यांनी जनतेसमोर ठेवली. एका भगिनीला त्रास दिल्यावर त्यांनी सख्त निर्णय घेतला, असे शरद पवार यांनी सांगितले.