Why I killed Ganghi विरोधात काँग्रेस आक्रमक, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत केली ही मागणी
Why I killed Ganghi चित्रपटाविरोधात काँग्रेस (Congress) चांगलीच आक्रमक झाली आहे. या चित्रपटावर बंद आणण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे.
मुंबई : Why I killed Ganghi या अमोल कोल्हे (Amol kolhe) यांच्या चित्रपटावरून जोरदार राजकारण तापलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याच चित्रपटावरून राष्ट्रवादीत दोन गट दिसून आले. राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनीही सुरूवातीला या चित्रपटाला विरोध केला, ती केवळ अभिनयाची भूमिका आहे. कोल्हे यांनी भूमिका साकरली म्हणन नथुरामच्या विचारांचे समर्थन होत नाही अशाही प्रतिक्रिया काही नेत्यांकडून आल्याचे दिसून आले. मात्र आता या चित्रपटाविरोधात काँग्रेस (Congress) चांगलीच आक्रमक झाली आहे. या चित्रपटावर बंद आणण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे हा चित्रपटाचा वाद आणखी चिघळला जाण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे यांचा या चित्रपटाबाबत करार हा राष्ट्रवादीत येण्यापूर्वी झाला होता, असाही दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. या चित्रपटामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
काँग्रेसने पत्रात काय म्हटले आहे?
गांधींची हत्या झाली याच दिवसाचे औचित्य सांधून कडव्या विचाराचे चित्रपट निर्माता Why I killed Ganghi हा चित्रपट प्रदर्शित करून पाहत आहेत. महात्म गांधींच्या विचाराने संपूर्ण जग प्रभावित आहे. आपल्या भारत देशाची ओळख महात्मा गांधी यांच्या नावाने होते. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या शस्त्रांचा वापर करून जग जिंकता येते हे गांधींनी आपल्या लढ्यातून दाखवून दिले आहे. म्हणून संपूर्ण जगभर ते परम पूज्यनीय आहेत. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचा दिवस एकता, जातीय सलोखा, अहिंसा आणि शांतता दिवसून म्हणून संपूर्ण जगभर पाळला जातो. एकिकडे महात्मा गांधींच्या पुण्यतिथीचा दिवस अहिंसा आणि शांतता म्हणून पाळला जात असताना दूसरीकडे अशांतता, द्वेश, आणि हिंसक वृत्तीचे प्रदर्शन करणारा Why I killed Ganghi हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामुळे फॅसिस्ट वृत्तीला बळ मिळेल. कोणत्याही घृणास्पद, अमानवीय कृत्याचे उदातीकरण भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. म्हणून हा चित्रपट राज्यात कोणत्याही चित्रपटगृहात आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रतिबंध करण्याबाबत काँग्रेस पक्षाची मागणी असून ती मान्य करण्यात यावी, ही विनंती असे काँग्रेसने पत्रात म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या चित्रपटाबाबत काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.