‘जिहाद’वरून शिवराज पाटील चाकूरकर यांची काही तासात पलटी; आता म्हणतात, मी कधी म्हटलं श्रीकृष्णाने…

पांडवाला एका घरात कोंडून, लक्षागृहात टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. द्रोपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. हे कृत्य दुर्योधनाने केलं. ते चांगलं कृत्य नाही. ते करण्यापासून त्यांना परावृत्त करण्यात आलं.

'जिहाद'वरून शिवराज पाटील चाकूरकर यांची काही तासात पलटी; आता म्हणतात, मी कधी म्हटलं श्रीकृष्णाने...
'जिहाद'वरून शिवराज पाटील चाकूरकर यांची काही तासात पलटी; आता म्हणतात, मी कधी म्हटलं श्रीकृष्णाने...Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 12:14 PM

नवी दिल्ली: कुराणाप्रमाणे गीतेतही (geeta) जिहाद आहे, असं विधान केल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर (shivraj patil chakurkar) वादात अडकले आहेत. त्यांच्या या विधानावर सत्ताधाऱ्यांनी सडकून टीका केली आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या या विधानावर काँग्रेस (congress) सहमत आहे का? असा सवाल शिंदे गटाने केला आहे. तर पाटील चाकूरकर यांना महाराष्ट्रातून हाकलून लावा, अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने केली आहे. हा वाद सुरू असतानाच शिवराज पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी कधी म्हटलं श्रीकृष्णाने जिहाद शिकवला? असा उलटा सवाल करत शिवराज पाटील यांनी आपल्या म्हणण्याचा विपर्यास केल्याचा दावा केला आहे.

शिवराज पाटील चाकूरकर यांनी टीव्ही9 मराठीशी एक्सक्ल्युझिव्ह संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या म्हणण्याचा विपर्यास केल्याचा दावा केला. मी कधी म्हटलं श्रीकृष्णाने अर्जुनला जिहाद शिकवला? तुम्हीच तसा अर्थ काढला आणि म्हणू लागलात. अर्जुनाने जे केलं त्यात श्रीकृष्णाचा हात होता असं तुम्ही म्हणणार आहात का? मी नाही म्हणणार असं, असं शिवराज पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मी माझं विधान पुन्हा तपासलं. त्यात मी असं म्हटलंच नाही. मी म्हटलं, श्रीकृष्णाने अर्जुनाला लढण्यासाठी सांगितलं त्याला तुम्ही जिहाद म्हणाल काय? या वाक्यातील काय हा शब्द मीडियाने काढून टाकला. त्यातील त्याला तुम्ही जिहाद म्हणाल, असं अर्धवट वाक्य ठेवलं. मीडियाने असं करणं हे बरोबर आहे का? असा सवाल त्यांनी केला.

महाभारतात दुर्योधनाचं… कौरवांचं आणि पांडवांचं भांडण सुरू होतं. पांडवाला एका घरात कोंडून, लक्षागृहात टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. द्रोपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. हे कृत्य दुर्योधनाने केलं. ते चांगलं कृत्य नाही. ते करण्यापासून त्यांना परावृत्त करण्यात आलं. पण ते करतच राहीले. नंतर लढाई करायला सांगितली. दुर्योधनाने जे केलं ते जिहाद होतं. तर पांडवाने जे केलं ते कर्तव्य होतं, असा खुलासाही त्यांनी केला आहे.

श्रीकृष्णाने सांगितल्या प्रमाणे याचा अर्थ असा होता. श्रीकृष्णाने अर्जुनाला लढाई करायला सांगितली तर त्याला जिहाद म्हणता येईल का? असं मी विचारलं. तुम्ही म्हणता ‘येईल का?’ असं काढून टाकलं. माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असं ते म्हणाले.

भाजप टीका करत आहे. श्रीकृष्णाने जिहाद शिकवला असं आम्ही म्हणू का? अशी आमची अक्कल आहे का? मीडियाने माझ्या विधानाचा विपर्यास केला म्हणून भाजपकडून टीका केली जात आहे. तुम्ही चुकीचा अर्थ काढला, असंही ते म्हणाले.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.